शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश कर आकारण्याचा ठराव, शिवसेनेसह राष्ट्रवादीचा कडाडून विरोध

शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर अर्थात टोल लावण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतमध्ये मांडण्यात आला आहे. (NCP Shivsena Oppose to impose Tax)

शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश कर आकारण्याचा ठराव, शिवसेनेसह राष्ट्रवादीचा कडाडून विरोध
शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश कर आकारण्याचा ठराव, शिवसेनेसह राष्ट्रवादीचा कडाडून विरोध
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 5:11 PM

अहमदनगर : निवडणुका आल्या की सर्वत्र राजकारण तापतं. असाच काहीसा प्रकार सध्या साईंची पुण्यनगरी असलेल्या शिर्डीत पहायला मिळत आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर अर्थात टोल लावण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतमध्ये मांडण्यात आला आहे. मात्र यावरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेना- राष्ट्रवादीत राजकीय कलगीतुरा भलताचं रंगला आहे. (NCP Shivsena Oppose Shirdi Nagar Panchayat impose Tax from Pilgrim entering City)

शिर्डीत येणाऱ्या भाविकांना आता प्रवेश कर आकारला जाणार आहे. साईबाबा संस्थानने शिर्डी नगरपंचायतला दिला जाणारा स्वच्छता निधी बंद केला आहे. त्यामुळे आता शिर्डी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा एकदा प्रवेशकर सुरू केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापूर्वी बंद झालेले टोल नाके पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपने हा ठराव मांडला आहे. स्थानिक महाविकास आघाडीचे नेते आगामी निवडणूक समोर ठेवून या ठरावाला विरोध करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतला गावाच्या स्वच्छतेचा मोठा भार पडत असतो. याआधी साईभक्तांना शिर्डीत येताना प्रवेशकर द्यावा लागत होता. मात्र भक्तांना हा त्रास होऊ नये यासाठी 2005 मध्ये शिर्डी स्वच्छतेसाठी नगरपंचायतला लागणारा निधी साईसंस्थानतर्फे देण्याचा निर्णय घेतला. शिर्डी संस्थानचे तात्कालीन अध्यक्ष कै. जयंत ससाणे यांनी हा निर्णय घेतला होता.

तेव्हापासून दर महिन्याला साईसंस्थानकडून नगरपंचायतला 42 लाख रूपये दिले जात होते. मात्र लाॅकडाऊनच्या काळात गेल्या मे महिन्यापासून साईसंस्थान प्रशासनाने दिला जाणारा निधी अचानक बंद केला गेला. त्यामुळे नगरपंचायतीला स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचं असा प्रश्न निर्माण झाला.

तसेच दर महिन्याला स्वच्छता करण्याचा ठेका दिलेल्या कंपनीला पेमेंट करणं अवघड झाले. साईसंस्थानने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक निधी देणं बंद केल्याने आता प्रवेशकर गोळा करण्याचा ठराव नगरपंचायतने केला आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विरोध

शिर्डी नगरपंचायतवर भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत नगरपंचायतची अडचण दूर करण्यासाठी आता साईभक्तांकडून प्रवेशकर आणि स्वच्छता कर आकारणी सुरू करण्यात येणार आहे. नगरपंचायतने राज्यसरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर कर गोळा करण्यासाठी नाके सुरु होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी हा ठराव मांडला आहे. पण या ठरावाला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोध केला आहे.

शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी प्रवेश कर वसूलीला कडाडून विरोध केला आहे. मात्र शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी समन्वयाची भूमिका घेतली आहे. तसेच साईबाबा संस्थानने बंद केलला स्वच्छता निधी द्यावा, अन्यथा आंदोलन करू असा पावित्रा घेतला आहे. शिर्डी नगरपंचायतीत अनिता जगताप या एकमेव नगरसेविका आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. जगताप यांच्या वक्तव्याने शिवसेनेत फूट पडल्याच दिसून येतं आहे.

शिर्डीच्या स्वच्छतेचा तिढा सुटणार का?

शिर्डीच्या प्रवेशद्वारावर टोलनाके सुरू हो़ऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या नाक्यांना परवानगी देणार का? आणि शिर्डीच्या स्वच्छतेचा तिढा सुटणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दोन वेळा स्वच्छतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी शिर्डी आगामी काळातही स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (NCP Shivsena Oppose Shirdi Nagar Panchayat impose Tax from Pilgrim entering City)

संबंधित बातम्या : 

अहमदनगर जिल्हा बँक महाविकास आघाडीच्या ताब्यात, अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला!

माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे, मुख्यमंत्र्यांनी भराडीदेवीकडे आशीर्वाद मागितला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.