Pimpri- Chinchwad Crime| पार्थ पवार अन मी मित्र, प्रकरण काय ते मिटवून घ्या ; पार्थ पवार यांच्या नावाने पिंपरी पोलिसावर दबाव ; काय आहे प्रकरण

Pimpri- Chinchwad Crime| पार्थ पवार अन मी मित्र, प्रकरण काय ते मिटवून घ्या ; पार्थ पवार यांच्या नावाने पिंपरी पोलिसावर दबाव ; काय आहे प्रकरण
Parth Pawar
Image Credit source: TV9

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड परिसरातील अमित कलाटे नावाच्या व्यक्तीवर जमीन व्यवहारात फसवणूक आणि सावकारकीचे गुन्हे नोंद आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे आणि व्याजाचे पैसे न दिल्याने महागडी मोटार ओढून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

रणजीत जाधव

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 30, 2022 | 1:02 PM

पिंपरी-  उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांच्या नावावे फोन करून पैसे मागितल्याच्या घटनेनंतर आता पार्थ पवारचा (Parth Pawar )मित्र असल्याचे सांगत पोलिसांवर दबाव आणल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police )स्थानकात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अश्रफ मर्चंट असे आरोपीचे नाव आहे . हिंजवडी पोलीस स्थानकात वाकड मधल्या अमित कलाटे याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यावरील गुन्हे  हटवण्यासाठी आरोपीने मी व पार्थ पवार मित्र आहोत. अमित कलाटेचे ही मित्र आहेत. अमितावर फसवणुकीचे गुन्हे. त्याचा विषय मिटवा असे सांगण्यात आले. या घटनेमुळे पोलीस दलात विविध चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितेनुसार आरोपी अश्रफ मर्चंट हिंजवडी पोलिसांवर पार्थ पवार यांच्या नावाने दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील आरोपी असलेल्या अमित कलाटे याच्यावरील गुन्हे मिटवा असा दबाव टाकण्यात आला. घटनेच्या वेळी आरोपी अश्रफ मर्चंट पोलिसांना फोन करून मी आणि पार्थ पवार यांचे पी ए सागर जगताप अमित कलाटेचे मित्र आहोत मी तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, वाटल्यास तुम्हाला मी जिजाई बंगला, भोसले नगर येथे थेट समोर घेऊन जाईन, अमितचा काय असेल तो विषय तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर हा विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी देखील मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे. असे बोलून आरोपीने फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक नकुल न्यामने यांना फोन केला होता.

अमित कलाटेवर काय आहेत गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड परिसरातील अमित कलाटे नावाच्या व्यक्तीवर जमीन व्यवहारात फसवणूक आणि सावकारकीचे गुन्हे नोंद आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे आणि व्याजाचे पैसे न दिल्याने महागडी मोटार ओढून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी 22 मार्च रोजी आरोपी मर्चंट याने फिर्यादीने पोलीसाला फोन केला होता.

Murder | बापाने मुलीला बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं, हत्येनंतर मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला

Nanar Refinery Project : रिफायनरी प्रकल्पावरुन रत्नागिरीत घमासान, बारसु सोलगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक

IPL 2022 : Kane Williamson कॅच आऊट नव्हता, तिसऱ्या पंचांचा निर्णय चूकला? SRH चे टीम डायरेक्टर म्हणाले…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें