सावधान! डेटींग ॲपवरुन तरुणीचा तब्बल 16 जणांना गंडा

आतापर्यंत तब्बल 16 जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. (Pimpari Chinchwad Women Fraud With Dating App)

सावधान! डेटींग ॲपवरुन तरुणीचा तब्बल 16 जणांना गंडा
फसवणूक
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:17 PM

पुणे : सध्याच्या धावपळीच्या जगात ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक फ्रॉड होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एका डेटींग ॲपवर बोगस प्रोफाईल तयार करुन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. सायली देवेंद्र काळे असे या मुलीचे नाव आहे. (Pimpari Chinchwad Women Fraud With Dating App)

सध्या मोबाईलमुळे अनेक गोष्ट सहज एका क्लिकवर करता येतात. मात्र हे ऑनलाईन जग किती धोकादायक आहे याचे उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाले. सायली काळे या मुलीने ऑनलाईन बंबल आणि टींडर या डेटिंग ऍपवर बोगस प्रोफाईल तयार केले. तिने आतापर्यंत तब्बल 16 जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

डेटिंग ॲपवरुन मैत्री करत फसवणूक 

पिंपरी चिंचवडमधील गुन्हे शाखा 4 च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी बंबल आणि टिंडर डेटींग साईटवरून तरुणांसोबत चॅटिंग करायची. त्यानंतर ओळख वाढवून त्यांना हॉटेलमध्ये बोलावत असे. सायलीची आई मानसिक तणावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे तिच्या गोळ्या सायली नकळत डेट करणाऱ्या व्यक्तीच्या खाण्यात मिसळत. यानंतर तो व्यक्ती बेशुद्ध झाला की, त्या व्यक्तीच्या अंगावरील सोने, पैसे लुटत असे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील वाकडमध्ये चेन्नईहून आलेल्या व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन तब्बल 1 लाख 50 हजाराची फसवणूक केली होती. यानंतर त्या व्यक्तीने पोलिसात सोने आणि पैसे लुटल्याची तक्रार दाखल केली होती. अशापद्धतीने देहूरोडमध्ये आणखी एका व्यक्तीला गंडा घातल्याची घटना समोर आली होती. यात 1 लाख 85 हजार रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती.

या दोन्ही घटनांमध्ये साम्य आल्याने पोलिसांनी बंबल डेटिंग ॲपवर खोटी प्रोफाईल बनवत तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर तिला तिच्याच जाळ्यात अडकवत तिला पोलिसांनी अटक केली.

यानंतर पोलीस तपासात तिने तब्बल 16 जणांना गंडा घातल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यापैकी केवळ 4 गुन्हे दाखल आहेत. शहरात ज्यांना या महिलेने गंडा घातला आहे, त्यांनी तक्रार द्यायला पुढे यावे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या तरुणीने काही तरुणींना ही फसवलं आहे.

या गुन्ह्यात महिलेने लुटलेले सोने हे सोन्याच्या दुकानात गहाण ठेवून ती तरुणी पैसे घेत होती. ज्या मोबाईलमध्ये हे बंबल आणि टींडर ॲप डाऊनलोड करून फसवणूक करत. यानंतर त्या मोबाईलमधून ते बंबल ॲप डिलीट करून मोबाईल फोडून टाकत असे. ही सर्व कल्पना तिला एक वेबसिरीज पाहून सुचल्याची माहिती तिने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. (Pimpari Chinchwad Women Fraud With Dating App)

संबंधित बातम्या : 

खळबळजनक, साताऱ्यात 150 फूट खोल दरीत बेपत्ता ट्रकचालकाचा मृतदेह आढळला

सख्खे भाऊ पक्के दरोडेखोर, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.