पिंपरी-चिंचवडमध्ये विळखा वाढला, कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कातील 11 जण पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवडमध्ये विळखा वाढला, कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कातील 11 जण पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने वाढ झालेल्या रुग्णांमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. (Pimpri Chinchwad Maximum Patients in a day)

अनिश बेंद्रे

|

Apr 24, 2020 | 11:57 AM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील तब्बल 11 जणांचे ‘कोरोना’ अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात पहिल्यांदाच एकाच दिवशी 11 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. 26 वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कातील हे 11 जण असल्याची माहिती आहे. (Pimpri Chinchwad Maximum Patients in a day)

पिंपरी-चिंचवडमध्ये नव्याने वाढ झालेल्या रुग्णांमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल रात्री उशिरा या सर्वांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल महापालिका आरोग्य विभागाला प्राप्त झाले.

निगडी परिसरात गुरुवारी एका 26 वर्षाच्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या तरुणाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या 25 जणांना महापालिका रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले होते.

या सर्वांचे कोरोना अहवाल आज सकाळी प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीन वर्षीय दोन चिमुकल्यांसह सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरुष आणि महिला या तीस वर्षाच्या आतील आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराची रुग्णसंख्या ही आता 81 वर जाऊन पोहचली आहे. यापैकी 21 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत तिघा जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

(Pimpri Chinchwad Maximum Patients in a day)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें