AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडच्या ‘वायसीएम’चा मोठा निर्णय, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालय हे कोरोनाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या 'वायसीएम'चा मोठा निर्णय, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा
| Updated on: Jan 04, 2021 | 2:51 PM
Share

पिंपरी चिंचवड : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालय हे इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांशिवाय इतर आजाराच्या रुग्णांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. (Pimpri Chinchwad YCM Hospital tstarted for patients with diseases other than corona)

सध्या रोज बाह्य रुग्ण विभागात कोरोना रुग्णांशिवाय आठशे ते एक हजार रुग्णांची ओपीडीमध्ये नोंद होत आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संसर्ग मार्चपासून सुरू झाला तेव्हापासून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सध्या रोज 15 ते 20 शस्त्रक्रिया होत आहेत. तर दिवसाला 20 ते 25 महिलांची प्रसूती केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

गेले नऊ महिने पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या झपाट्याने झाला. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती तसंच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत होती. महाराष्ट्रात तर पुणे-पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले. कोरोनाचा बिमोड करण्यात आणि रुग्णांनी आजारावर मात करण्यात वायसीएमचा मोठा वाटा आहे.

दरम्यान, राज्यासह पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. अगदी मोजक्या संख्येने आता कोरोना रुग्ण मिळत आहेत. पिंपरी चिंचवड प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोव्हिड काळात नागरिकांची चांगली काळजी घेतली. आता नागरिकही कोरोना नियमांचं पालन करत असल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. (Pimpri Chinchwad YCM Hospital tstarted for patients with diseases other than corona)

हे ही वाचा :

मनसेतही मेगाभरती सुरु, ‘कृष्णकुंज’बाहेर झुंबड, काही डबेवालेही ‘रेल्वे इंजिना’त!

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.