VIDEO: पैठणीचं कापड, ऑस्ट्रेलियन डायमंड अन् राजमुद्रा; कसा आहे मोदींचा शाही फेटा; वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण होणार आहे. तसेच पुणे महापालिकेलाही ते भेट देणार आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पुणे महापालिकेत येणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.

VIDEO: पैठणीचं कापड, ऑस्ट्रेलियन डायमंड अन् राजमुद्रा; कसा आहे मोदींचा शाही फेटा; वाचा सविस्तर
पैठणीचं कापड, ऑस्ट्रेलियन डायमंड अन् राजमुद्रा; कसा आहे मोदींचा शाही फेटाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 9:45 AM

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आज पुण्याच्या (pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण होणार आहे. तसेच पुणे महापालिकेलाही ते भेट देणार आहेत. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पुणे महापालिकेत (pune corporation) येणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत मोदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मोदींचा सत्कार करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खास फेटा तयार करून घेतला आहे. पैठणीच्या कापडावर खास जरीकाम करून त्यावर ऑस्ट्रेलियन डायमंड लावलेला हा फेटा आहे. तसेच या फेट्यावर सूर्यफूल काढण्यात आलं असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा तयार केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध फेटेवाले मुरुडकर यांनी खास मोदींसाठी हा फेटा बनवला आहे. हा फेटा बनवताना मोदींचा कपड्यांचा सेन्स लक्षात घेण्यात आला असून या फेट्याला ऐतिहासिक टच देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या या खास फेट्याची माहिती प्रसिद्ध फेटेवाले मुरुडकर यांनी माहिती दिली आहे. यंदा नेहरूंनंतर मोदी पहिल्यांदाच पुणे पालिकेत येत आहेत. त्यामुळे पुणेकरांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या दर्जाचा फेटा तयार करून हवा अशी इच्छा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार या फेट्याची डिझायनिंग तयार करण्यात आली आहे. ऐतिहासिक पद्धतीने हा फेटा बनवायचा निर्णय घेतला होता, असं मुरुडकर यांनी सांगितलं.

फेट्यात एअर व्हेंटिलेशनचीही व्यवस्था

मोदींचा कपड्यांचा सेन्स लक्षात घेता त्यांच्या कपड्यांवर मॅच होण्यासाठी क्रिम कलर निवडला. ऐतिहासिक टच देण्यासाठी पैठणीचे कापड आणि त्या पद्धतीचे जरीकाम करण्यात आलं. सोनेरी विथ क्रीम कलर असं कॉम्बिनेशन ठरलं. त्यावर गोल्डप्लेटेड ज्वेलरी लावण्यात आली. या फेट्यावर भारीतील ऑस्ट्रेलियन डायमंड आणि विशिष्ट दर्जा असणारे डायमंड वापरले आहेत. फेट्यावरील सूर्यफुलावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा बसवली आहे. त्याला मोत्याचं डेकोरेशन करण्यात आलं आहे. सूर्यफूलाची नजर नेहमी वर आणि तेजाकडे असते. त्यामुळे फेट्यावर सूर्यफुलाचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच डिझायनर फेट्यात एअर व्हेंटिलेशनची व्यवस्था केली. कारण हवा खेळती राहील आणि घालणाऱ्याला घाम येणार नाही, असं मुरुडकर यांनी सांगितलं.

फेट्याला विरोध

दरम्यान, मोदींना देण्यात येणाऱ्या फेट्यात छत्रपतींची राजमुद्रा वापरण्यात आल्याने काँग्रेसने त्याला विरोध केला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु आहे. राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून काँग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

फेट्यावरून राजकारण नको

दरम्यान, फेट्यावरून सुरू असलेल्या राजकारणाला भाजपने विरोध केला आहे. मोदींच्या विरोधात आंदोलनं करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जातंय. फेट्याला विरोध करून काँग्रेस राजकारण करत आहे. काँग्रेसचे राजकारण पुणेकरांना चांगलं माहीत आहे. फेट्याच्या विषयावर काँग्रेसने राजकारण करू नये, असं आवाहन भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केलं आहे.

असा आहे मोदींचा दौरा

मोदी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथं त्यांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी 11 वाजता पोहोचतील. त्यानंतर 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर तिथं त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभा संपल्यानंतर आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन ते दीड वाजता करतील. त्यानंतर तीन वाजता ते पुण्यातून रवाना होतील अशी माहिती प्राथमिक माहिती आहे.

संबंधित बातम्या:

Modi In Pune: पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तास पुण्यात, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Video: पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती, 9 तासाच्या चौकशीनंतर नारायण राणेंनी पवारांना आठवणीनं उत्तर दिलं

PM Modi In Pune: पुण्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ना आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजेरी लावणार, कारण काय?

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.