AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUNE-Mumbai : पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत शक्य, कसा होणार वाचा

पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत करता येणार आहे. पुणे आणि मुंबई हवाईमार्ग सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अवघड आहे.

PUNE-Mumbai : पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत शक्य, कसा होणार वाचा
Airlines offerImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 12, 2023 | 11:52 AM
Share

पुणे  : मुंबई-पुणे (PUNE-Mumbai)नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. त्यांना रेल्वे व रस्ते मार्गाने तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र आता हा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. पुणे आणि मुंबई प्रवास फक्त २५ मिनिटांत करता येणार आहे. पुणे आणि मुंबई हवाईमार्ग सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणे अवघड असल्याने दिवसातून एकतरी विमान सुरु करावे, यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासंदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडेही प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

पुणे-मुंबई हवाई मार्ग सुरु झाल्यास रस्ते वाहतुकीला आणखी एक जलद पर्याय मिळणार आहे. त्यामुळे वेळेत बचत होणार आहे. तसेच प्रवाशांना मुंबई विमानतळावरुनच आंतराराष्ट्री प्रवास करता येणार आहे.

२००८ मध्ये सुरु होती सेवा : पुणे-मुंबई विमानसेवा २००८ मध्ये सुरु होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेजने पुणे-मुंबई विमानसेवा सुरु केली. मात्र ही सेवाही काही कारणांमुळे बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याच्या चर्चा झाल्या. परंतु ठोस काहीच भूमिका घेतली गेली नाही.

काय होणार फायदा : पुण्यातील लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढली आहे. पुण्यातून परदेशात दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. परंतु पुण्यातून इतर देशांसाठी विमानसेवा नाही. पुणे-मुंबई विमानसेवा सुरु झाल्यास इतर देशांमध्ये जाण्यास या प्रवाशांना फायदा होणार आहे.

हायपरलूपची होती चर्चा : मुंबई-पुणे हायपरलूप मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरुनच समांतर जाईल. हायपरलुप वाहतूक सध्याची आधुनिक प्रकारातील वाहतूक मानली जाते. याद्वारे कमीत कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता येते. ही वाहतूक विशेष अशा हायपरलुप वाहनातून कमी दाबाच्या ट्युबमध्ये वीजेच्या वेगाप्रमाणे होते. हे वाहन चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करुन ट्रॅकच्या वर तरंगत प्रवास करते.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.