AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन, गेल्या महिन्याभरापासून होत्या आजारी

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे राजकीय नुकसान झाल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन, गेल्या महिन्याभरापासून होत्या आजारी
मुक्ता टिळकImage Credit source: tv 9 Marathi
| Updated on: Dec 22, 2022 | 4:33 PM
Share

पुणेः पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान पुण्यात निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील।खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पु्ण्याचे महापौर पदही त्यांनी भूषवले होते. आमदार मुक्ता टिळक यांच्यावर आता उद्या सकाळी 11 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. 2002 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या आता आमदार झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीमध्ये त्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता.

सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा मोठा गौरवही करण्यात आला होता. पुण्याच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते.

पुण्याच्या महापालिकेमध्ये त्यांची कामगिरी श्रेष्ठ ठरल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कामामुळे आमदारकीवर आपले नाव कोरले होते.

मुक्ता टिळक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली होती. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं होते त्यानंतर त्यांनी एमबीएही केले होते.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर पुण्याबरोबरच इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  भाजप नेत्यांनी त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच आमच्या पक्षाचीही मोठी हानी झाली असल्याची भावना भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी आपल्या कामगिरीमुळे वेगळा ठसा उमटविला होता.

फडणवीस यांनी केलं होतं कौतुक

सत्तांतरापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मुक्ता टिळक यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मे महिन्यात झालेल्या या मतदानाला त्या विशेष वाहनाने पुण्यातून मुंबईत आल्या होत्या. व्हिल चेअरवर बसूनच त्यांनी मतदान केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं होतं. एक एक मत आमच्यासाठी मौल्यवान असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.