AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avinash Bhosale | पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांची लंडनमध्ये प्रॉपर्टी, घोटाळ्यात लाटलेले 300 कोटी रुपये संपत्तीत गुंतवल्याचा सीबीआयचा आरोप

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले हे रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जातात. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

Avinash Bhosale | पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांची लंडनमध्ये प्रॉपर्टी, घोटाळ्यात लाटलेले 300 कोटी रुपये संपत्तीत गुंतवल्याचा सीबीआयचा आरोप
अविनाश भोसलेImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 10:11 AM
Share

पुणेः कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांनी या घोटाळ्याच्या पैशांतूनच लंडनमध्ये मोठी मालमत्ता (Property in London) खरेदी केल्याचं समोर आलं आहे. सीबीआयच्या (CBI) आरोपपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपात ही माहिती उघड झाली आहे. या आठवड्यात सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अविनाश भोसले यांच्याविरोधात हे आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रातील माहिती नुकतीच उघड करण्यात आली. अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये एक संपत्ती खरेदी करण्यासाठी डीएचएफएलकडून मिळालेल्या 550 कोटी रुपयांपैकी 300 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनेही त्यांचा ताबा घेतला होता. सीबीआयनं जो तपास केला आहे तो डीएचएफल संबंधित होता. या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये जवळपास 1000 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्यापैकी 300 कोटी रुपये त्यांनी स्वतः भरले होते. 700कोटी डीएसएफल बँकेचं कर्ज आहे. ते कर्ज मंजूर करून घेतलं होतं. फ्लोरा डेव्हलपमेंट नावाची त्यांची कंपनी आहे. त्या कंपनीच्या खात्यात येस बँकेनं कर्ज वळतं केलं होतं,असं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं आहे.

आरोपपत्रात काय म्हटलंय?

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने भोसले यांना दीवान हौसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) आणि येस बँक (Yes Bank) संबंधित कथित घोटाळ्यात अटक केली आहे. या आठवड्यात सोमवारी सीबीआयच्या विशेष कोर्टात त्यांच्याविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत विशेष सीबीआय कोर्टात दाखल आरोप पत्रासंबंधी एजन्सीने सत्यन गोपालदास टंडन, मेट्रोपोलिस हॉटेल्स एलएलपी, एबीआयएल इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एबीआयएल हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, अरिंदम डेव्हलपर्स, अविनाश भोसले ग्रुप आणि फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिडेटचाही उल्लेख केला आहे. या प्रकरणातील सह आरोपी संजय छाबरिया यांनी 317.40 कोटी रुपये वळते केले. ही रक्कम म्हणजे भोसले यांनी डीएचएफएलला येस बँकेकडून कर्जापोटी दिलेले होते, असे आरोपात म्हटले आहे. सीबीआयच्या मते, एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरला 43 कोटी रुपये आणि मेट्रोपोलिस हॉटेल्सला 140 कोटी रुपये देण्यात आले होते. डीएचएफएलचे कपिल वाधवान यांनी एप्रिल 2018 मध्ये येस बँकेने डीएचएफएलमध्ये गुंतवणूक केल्यानंतर लगेच वसुलीसाठी मंजुरी दिली होती. एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रोपोलिस हॉटेल दोन्हीही भोसले यांच्या मालकीचे आहेत.

अविनाश भोसलेंवर नेमके आरोप काय?

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले हे रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जातात. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणात गैरव्यवहार करत 292 कोटी रुपये इतरत्र वळवण्याचा आरोप भोसले यांच्यावर आहे. 2018 मध्ये ही पैसे वळवल्याचा आरोप सीबीआयने केले आहे. वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयच्या मते, यात मोठ-मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश आहे. या नेटवर्कमध्ये बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त झाली आहे. यात त्यांच्या विविध कंपन्यांचे शेअर्स, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.