अरेच्या पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यमदूत…

Pune News | पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गुरुवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दोन वेगवेगळे आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची गंभीरता समोर आली. वाहतूक कोंडीला त्रस्त पुणेकरांसाठी आम आदमी पक्षही सरसावला आहे. 'आप'ने थेट सिग्नल यंत्रणेची पूजा केली आहे.

अरेच्या पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यमदूत...
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 12:25 PM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2024 | पुणेकर आणि वाहतूक कोंडी हे अतुट समीकरण झाले आहे. शासन प्रशासनाकडून अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा तयार केल्यानंतरही पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होत नाही. उलट वाहतूक कोंडी वाढत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रोज चाकरमान्यांना बसतो. परंतु रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची अवघड वाट काढावी लागते. यामुळे काही वेळा रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गुरुवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने दोन वेगवेगळे आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची गंभीरता समोर आली.

काँग्रेसने आणला यमदूत

पुण्यातील स्वारगेट चौकात वेक अप पुणेकर आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी वाहतूक कोंडीवर लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. काँग्रेसने आंदोलनात यमदूत आणला. वाहतूक कोंडीमुळे एम्बुलेंस वेळेत न पोहोचल्याने रुग्णांचा जीव जात आहे. त्यामुळे यमदूत वाहतूक कोंडी सोडवण्याचे आवाहन करत आहे. तसेच यावेळी फलकही लावण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पुण्यातील ट्रॅफिकमुळे दवाखान्यात वेळेवर न पोहचू शकणाऱ्या रुग्णवाहिकेतील सिरियस रुग्णांना मी रोज घेऊन जातो.

हे सुद्धा वाचा

आपकडून असे आंदोलन

वाहतूक कोंडीला त्रस्त पुणेकरांसाठी आम आदमी पक्षही सरसावला आहे. ‘आप’ने थेट सिग्नल यंत्रणेची पूजा केली आहे. पुण्यातील शिवणे भागात आम आदमी पार्टीने अनोखे आंदोलन केले आहे. आम आदमी पार्टी, वारजे विभाग यांच्या वतीने या ठिकाणी वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे आणि गेल्या पाच वर्षांपासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेचा पूजा केली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सिग्नल यंत्रणेला हार फुले वाहिली आहे. आपच्या या आंदोलनाची चर्चा परिसरात चांगलीच झाली.

रोज वाहतूक कोंडी

शिवणे भागात रोज सकाळी ८ ते 11 व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. गेल्या पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा चालू केली असती तर या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल, असे मत शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे यांनी मांडले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.