पुण्यातील ज्येष्ठांची लसीकरणात आघाडी, 64 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस

Pune Coronavirus | ससून रुग्णालयात म्युकर मायक्रोसिसचे पाच नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. सध्या पुण्यात 44, पिंपरी-चिंचवडमध्ये 2, ग्रामीण भागात 3, तर ससून रुग्णालयात 95 अशा 144 जणांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यातील ज्येष्ठांची लसीकरणात आघाडी, 64 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस
कोरोना लस


पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणात मारली बाजी मारल्याचे चित्र आहे. शहरासह जिल्ह्य़ात आतापर्यंत 88 टक्के ज्येष्ठांनी पहिली, तर 64 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना दोन्ही डोस घेतले आहेत. इतर वयोगटातील अपेक्षित लाभार्थ्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वाधिक झाल्याचे जिल्हा प्रशासनाची माहिती आहे.

म्युकरमायकोसिसचा धोका

ससून रुग्णालयात म्युकर मायक्रोसिसचे पाच नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. सध्या पुण्यात 44, पिंपरी-चिंचवडमध्ये 2, ग्रामीण भागात 3, तर ससून रुग्णालयात 95 अशा 144 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पुण्यात 428, पिंपरी-चिंचवडमध्ये 264, ग्रामीण भागात 85 आणि ससून रुग्णालयात 363 अशा 1 हजार 140 रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. म्युकरमायकोसिसमुळे शहरासह जिल्ह्यात एकूण 217 जणांचा मृत्यू झाला असून या आठवड्यात एकही मृत्युची नोंद नाही.

पुण्यात ‘लसीकरण आपल्या दारी’ अभिनव उपक्रम

पुणे शहरात 108 टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नसते, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

वंचित समाजासाठी लसीकरण मोहिम

वंचित समाज पोतराज, गोधडी शिवण्याचा व्यवसाय करणारे, नंदीवाला या समाजात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा होती. लस घेण्यासाठी हा समाज तयार होत नसे. जन जागृती नव्हती. कात्रज कोंढवा रस्ता परिसरातील प्रगती फाउंडेशनकडून लस परिसर १०० टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने या समाजाची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर या भागात घरोघरी जाऊन लस देण्यात आली आहे.

प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटलचा लसीकरणासाठी पुढाकार

वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक असे लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत. अनेकांमध्ये लसीकरणाविषयी जागृती नाहीये. अशा लोकांसाठी हा उपक्रम असून कात्रजमधील प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

प्रत्येकाला घरी जाऊन लस देणार

ही मोहिम ८ ऑक्टोबर पासून कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राबविण्यात येत आहे. प्रतिक कदम यांच्या संकल्पनेतून कोरोनावर मात करण्यासाठी परिसर 100 टक्के लसीकरणयुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, मुंबईत हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना दिवाळीपूर्वी शिथिलता? डॉ. भारती पवार म्हणतात, तज्ज्ञांचं मत घ्या

पुण्यात ‘लसीकरण आपल्या दारी’ अभिनव उपक्रम, पोतराज, नंदीवाल्यांना जनजागृती करुन लस

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI