AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, मुंबईत हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, मुंबईत हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
HOTEL
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 7:41 PM
Share

मुंबई : मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. (maharashtra government and cm uddhav thackeray allow mumbai shops and hotel to open till 12 pm information given by rajesh tope)

 लास्ट ऑर्डर रात्री एक वाजपेर्यंत  

सध्याची कोरोना स्थिती तसेच निर्बंध या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच निर्णयांतर्गत आता मुंबईतील हॉटेल्स तसेच दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री एक वाजेपर्यंत हॉटेल्सना शेवटची ऑर्डर घेता येईल असादेखील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

अन्य जिल्ह्यांचा निर्णय स्थानिक पातळीवर 

17 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये एकही कोरोना रुग्ण दगावला नाही. तसेच सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत दुकाने, हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याचा हा निर्णय फक्त मुंबई शहराच्या हद्दीपुरताच मर्यादित राहील. तर बाकीच्या जिल्ह्यांबाबात निर्णय घेण्याचे अधिकार तेथील स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

इतर बातम्या :

T20 World Cup 2021: अप्रतिम! 4 चेंडू 4 विकेट, आयर्लंडच्या कर्टिस कँफरचा नवा रेकॉर्ड, पाहा VIDEO

VIDEO : ऐकावं ते नवलच! मुंबईत भारतीय पोशाख परिधान केल्यास चक्क रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही

मोठेपण ! चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, नेमकं काय झालं?

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.