Pune crime| ‘त्या’ मुलीकडून माझी बदनामी सुरु ; रघुनाथ कुचिक यांची सायबर पोलिसात तक्रार

 तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली.त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.

Pune crime| 'त्या' मुलीकडून माझी बदनामी सुरु ; रघुनाथ कुचिक यांची सायबर पोलिसात तक्रार
pune-police
योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 14, 2022 | 1:05 PM

पुणे- शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Babanrao Kuchik) याच्याविरोधात24  वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यावर बलात्काराचा केल्याचं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली.त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पिडित मुलीनं फेसबुकवर एक पोस्ट लिहली असुन अत्याचाराचा आरोप केलाय. व्हाट्सअप चॅट (Whatsapp chat)देखील फेसबुकवर टाकलं आहे. यानंतर मुलीच्या फेसबुक पोस्टनंतर(Facebook post) रघुनाथ कुचिक यांनी पुणे सायबर पोलीसांत तक्रार दाखल केलीय असून ,मुलीकडून माझी बदनामी सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने या घटनेबाबत शिवाजी नगर पोलिसात तक्रार दिली होती. हा प्रकार 6नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022  या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कुचिक हा शिवसेनेचा उपनेता आणि भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. तसेच, राज्याच्या किमान वेतन समितीचा अध्यक्ष आहे.

त्याला जबाबदार कुचिकसह राज्य सरकार असेल

मी अत्यंत व्यथित होऊन हा व्हिडीओ करत आहे. शिवसेनेचा पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक ज्याला राज्यमंत्री पदाचा दर्जाही त्याला दिला आहे. अश्या हरामखोर , बलात्काऱ्याने केला मुलेवर बलात्कार , त्यानंतर जबरदस्तीने त्या मुलीचा गर्भपात केला. याबाबत त्या पीडित मुलीने समोर येऊन या सगळ्या गोष्टी संगीतल्या . एवढी गोष्टी, पुरावे असतानाही त्याला जामीन कसा काय मिळतो माहीत नाही. जामीनावर बाहेर असलेल्या या आरोपीकडून पीडितवर दबाव निर्माण केला जात आहे. ही केस मागे घे म्हणून मेसेजेस करतोय . हे मेसेजेस कुणाला दाखवायचे त्यांना दाखव मला काही फरक पडत नाही अशी धमकी ही त्या मुलाला दिली जातेय. त्याच्यामागे त्याचा कर्ताकरविता धनी कोण आहे. याबाबत पीडित मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले आहे ,की मी स्वतःला संपवत आहे. तिने जर तिच्या जीवाच काही बारवाईट केलं तर त्याची जबाबदारी कुचिकसह पुणे पोलीस प्रशासन व राज सरकाराची आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून रघुनाथ कुचिकवर हल्ला बोल केला

पुणे पोलिसांकडून तपास सुरु

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून रघुनाथ कुचिकवर हल्ला बोलकेला. तसेच पोलीस प्रशासनांवरही ताशेरे ओढले आहेत. यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला आहे. पीडित तरुणीने फेसबुक पोस्ट करत आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये तिने रघुनात कुशीक यांच्या सोबत चॅटिंगचेस्क्रिनशॉटही टाकेल आहेत. यात रघूनाथ कुचिकांनी व्हॉट्स अपवर मेसेज करत सुसाईड करणार होतीस ना ? तुझ्या बातमीची वाट पाहतोय असा मेसेज केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. यानंतर गायब असलेल्या तरुणीचा फोनही बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

#Himveers : कबड्डी… कबड्डी… कडाक्याच्या थंडीत ITBP जवानांचा रंगला खेळ, Video viral

बापरे! होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड, महाराष्ट्रातल्या गावातली 80 वर्ष जुनी परंपरा

फडणवीसांना कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा हेतू नाही; दिलीप वळसे पाटीलांची स्पष्टोक्ती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें