बापरे! होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड, महाराष्ट्रातल्या गावातली 80 वर्ष जुनी परंपरा

भारतामध्ये वेगवेगळ्या परंपरा हमखास जपल्या जातात परंतु भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एका गावात होळीच्या दिवशी नव्या जावयाची चक्क गाढवावर बसवून धिंड काढली जाते.ही परंपरा गेल्या 80 वर्षा पासून पार पाडली जात आहे.

बापरे! होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड, महाराष्ट्रातल्या गावातली 80 वर्ष जुनी परंपरा
Holi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:00 PM

मुंबई : होळी सणाला( Holi festival 2022) काही दिवसच बाकी आहे. देशातील कानाकोपऱ्यात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.अनेक ठिकाणी हा होळीचा सण खेळताना हसी मजाक,चेष्टा मस्करी देखील केली जाते. हा सण वेगवेगळ्या परंपरा जपत साजरा केला जातो. या सणामागे अनेक वेगवेगळ्या भावना देखील प्रत्येकाच्या मनात असतात. महाराष्ट्रातील एका गावामध्ये हा सण साजरा करत असताना चक्क नव्या जावयासोबत गाढवावरून धिंड काढली जाते. ही परंपरा देखील आनंदाने गावकरी साजरा करत असतात. जेव्हा सासरी पहिल्यांदा नवीन जावई आपल्या पत्नीसोबत येतो तेव्हा होळीच्या दिवशी जावयाचा मान सन्मान करून ही परंपरा जावई सोबत साजरी केली जाते. महाराष्ट्रातील बीड मध्ये होळीच्या सणाला जावई सोबत एक आगळीवेगळी परंपरा साजरी केली जाते.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा यवता गावामध्ये होळीच्या दिवशी जावयाला संपूर्ण गावामध्ये गाढवावर बसवून रंग लावण्याची एक परंपरा (holi rituals) आहे. ही परंपरा गेल्या 80 वर्षापासून पार पाडली जात आहे. या परंपरेमागे असलेली कथा देखील तितकीच रंजक आहे.चला तर मग जाणून घेऊया या 80 वर्ष जुन्या परंपरेबद्दल.

खरंतर होळीच्या दिवशी अनेक लोक वेगवेगळे रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळतात.जर रंग खेळताना रंग नैसर्गिक असतील तर शरीरावरील रंग सहजरित्या निघून जातात परंतु जर होळी खेळताना रंगांमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरले गेले असेल तर शरीरावरुन रंग सहसा निघत नाही. म्हणूनच अनेक जण होळीचा खेळ खेळणे पसंत करत नाही. अनेकजण कुठेतरी लपून बसतात. बहुतेक वेळा जबरदस्तीने रंग लावल्यामुळे भांडणे देखील होतात म्हणूनच “बुरा ना मानो होली हे “अशी म्हण देखील कामी येत नाही अशीच काहीतरी घटना 80 वर्ष पूर्वी घडली होती.

काय आहे आख्यायिका

आजपासून 80 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा यवता गावामध्ये देशमुख परिवारातील दोन जावयांनी होळीच्या दिवशी रंग लावण्यास मनाई केली होती. सासरकडच्या मंडळींनी रंग लावण्यासाठी त्यांना तयार केले परंतु याचा फारसा काही परिणाम न झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी फुलांनी सजलेला एक गाढव मागवला आणि त्या गाढवावर दोन्ही जावयांना बसवले.या दोन्ही जावयाची पूर्ण गावामधून मिरवणूक देखील काढली.सुरुवातीला जावयांना गाढवावर बसून मंदिरापर्यंत घेऊन जाण्यात आले. तिथे गेल्यावर जावयांची आरती उतरवण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि सोन्याची अंगठी दिली गेली. तिथे गेल्यावर त्यांचे तोंड गोड करण्यात आले आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावण्यात आला. त्या दिवसापासून ते आजतगायत या गावांमध्ये असेच घडत आलेले आहे म्हणूनच ही परंपरा आज ही तशीच जपली जात आहे.

या गावांमध्ये प्रत्येक वर्षी होळी सणाच्या पूर्वी नव्या जावयाचा शोध घेतला जातो. ज्या जोडप्यांचे नवीन नवीन लग्न झालेले आहे,अशा जावयांना होळीच्या दिवशी गावांमध्ये आमंत्रित केले जाते. गावातील होळी नव्या जावया सोबत साजरी केली जाते. बहुतेक वेळा गावातील जावई या परंपरेपासून पळ काढण्यासाठी कुठेतरी लपून देखील बसतात परंतु गावकऱ्यांची या जावयांवर संपूर्ण नजर असते, जेणेकरून ही परंपरा प्रत्येक वर्षी जपली गेली पाहिजे. या परंपरेमध्ये कोणताही खंड पडू नये म्हणून गावकरी नेहमी काळजी घेत असतात परंतु गेल्या वर्षी कोरोना महामारी च्या कारणामुळे ही परंपरा साजरी करण्यात आली नव्हती. या वर्षी ही परंपरा साजरी करण्यासाठीं गावकरी जय्यत तयारी करत आहेत. आता तुम्हाला सुद्धा या परंपरेबद्दल मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतील. ही परंपराच आगळी वेगळी आहे.ही परंपरा जरी विचित्र असली तरी गावांमध्ये तितक्याच जल्लोषाने आणि आनंदात साजरी केली जाते.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.