पुणे डीआरडीओ संचालक हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, फॉरेन्सिक अहवालातून मिळाली महत्वाची माहिती

Pune honey trap : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तनच्या हनी ट्रॅपमध्ये सहज अडकले. त्याने पाकिस्तानला काय माहिती दिली का? यासंदर्भातील फॉरेन्सिक अहवाल आता आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती मिळाली आहे.

पुणे डीआरडीओ संचालक हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, फॉरेन्सिक अहवालातून मिळाली महत्वाची माहिती
drdo scientist
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 1:28 PM

पुणे : पुणे DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी महिला गुप्तहेराने निर्माण केलेल्या हनी ट्रॅपमध्ये सहज अडकले. त्या गुप्तहेर असलेल्या महिलने प्रदीप कुरुलकर याच्याशी पहिल्यांदा व्हॉटसॲपच्या माध्यमातून संपर्क साधला. मग दोघांमध्ये संवाद सुरु झाला. मग प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला काय माहिती दिली? याचा तपास एटीएसने सुरु केला होता. यासंदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. कुरुलकर यांच्या संगणकाचा फॉरेन्सिक अहवाल मिळाला आहे. त्यातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत.

काय आहे अहवालात

डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात महत्वाची अपडेट आली आहे. कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. त्या अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

महिलांच्या अनुषगांने तपास

डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना देखील कुरुलकर भेटले होते. त्या महिला कोण आहेत? त्या कशासाठी आल्या होत्या.या अनुषंगाने देखील एटीएस तपास करणार आहे.

पाकिस्तानी गुप्तहेराशी भेट झाली का?

देशाची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या या DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला महाराष्ट्र एटीएसच्या पुणे युनिटने अटक केली आहे. कुरुलकर पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. कुरुलकर एका पाकिस्तानी महिलेशी ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलायचा, असे तपासात समोर आले आहे. मात्र, तिला तो कधीच भेटला नाही. याशिवाय डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर इतर महिलांनाही भेटत असत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या महिलांची ओळख पटवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, या महिलांचा पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणाशी काहीही संबंध नाही. परंतु कुरुलकर आणि महिला असे प्रकरण समोर येत आहे.

व्हॉट्सॲप चॅट्समध्ये काय होते

एटीएसला भारतीय शास्त्रज्ञ कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्या व्हॉट्सॲप चॅट्स मिळाल्या आहेत. एका चॅटमध्ये तो पाकिस्तानी गुप्तहेर रशियातून लंडनला येत असल्याचे सांगत होता. परंतु कुरुलकरने एटीएसला सांगितले की, रशियाला गेला नाही किंवा लंडनलाही गेला नाही, असे उघड झाले आहे.

Non Stop LIVE Update
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.