AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Teacher Constituency : पुणे शिक्षकच्या जागेसाठी शिवसेना-भाजप दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल, आता माघार कोण घेणार? उदय सामंत बोलले

Pune Teacher Constituency : शिंदे शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे महायुतीमध्ये पुण्याच्या जागेवरुन मतभेद असल्याचं स्पष्ट होतं. आज मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

Pune Teacher Constituency : पुणे शिक्षकच्या जागेसाठी शिवसेना-भाजप दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल, आता माघार कोण घेणार? उदय सामंत बोलले
Devendra Fadnavis -Eknath ShindeImage Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2026 | 2:08 PM
Share

विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या जागांसाठी निवडणुका आहेत. यात पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरुन महायुतीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. काल पुणे पदवीधरसाठी स्मिता जाधव आणि पुणे शिक्षकसाठी कौतुभ गावडेंनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर आज एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे महायुतीमध्ये पुण्याच्या जागेवरुन मतभेद असल्याचं स्पष्ट होतं. आज मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. “पहिली गोष्ट म्हणजे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. पाच जागा आहेत. नागपूरची जागा शंभर टक्के भाजपचीच आहे. अमरावतीची जागा शिवसेनेला सोडण्यात आलेली. छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलेली. शरद लाड जिथून इच्छुक होते ती भाजपला दिलेली. ही जागा पेंडिंग होती. शिवसेनेचा एबी फॉर्म देऊन आम्ही आमचा दावा पक्का केलाय” असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“9 तारखेपर्यंत या जागेवर दोन्ही नेते बसून निर्णय घेतील.चर्चा फिस्कटली आहे का? काही चर्चा फिस्कटलेली नाही. या जागेवर आमचा दावा आहे. भाजपने त्यांचा फॉर्म भरलेला आहे. शिंदेसाहेब-फडणवीस साहेब एकत्र बसून निर्णय घेतील.माघार कोण घेणार, हे सगळे अधिकार दोन नेत्यांचे आहेत. त्यांचा जो निर्णय असेल, तो आम्हाला मान्य असेल. मंगेश चिवटे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. आम्ही ही जागा जिंकणार आणि पुढची सहावर्ष आमदार राहणार असा विश्वास” उदय सामंत यांनी व्यक्त केला.

शिक्षकांनी निवडणूक हाती घेतलेली आहे

“सर्वप्रथम मी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मी कुणा शिक्षण सम्राटाचा मुलगा नाहीय. मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय. शिक्षक बंधू-भगिनीच्या आझाद मैदानातील आंदोलनात घेतलेला सहभाग, जुनी पेन्शन योजना, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना आणणं. शिक्षकांनी निवडणूक हाती घेतलेली आहे. शिंदेसाहेबांनी दोन वर्षांपूर्वी मला मेहनत घेण्याचे आदेश दिलेले. आम्ही 22 हजारापर्यंत मतदार नोंदणी केली. शिंदे साहेबांच्या आशिर्वादाने 22 हजार शिक्षक मतदारांच्या आशिर्वादाने आम्ही लढणार आणि जिंकणार” असा विश्वास मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.

Follow Us
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट