ट्रम्प तात्यानंतर ‘बायडेन भाऊ’-‘कमला अक्का’ची हवा, पुण्यात पोस्टरबाजी

पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात 'घासून नाय, ठासून आलोय' असं पोस्टर झळकलं (Pune Poster Joe Biden Kamala Harris)

ट्रम्प तात्यानंतर 'बायडेन भाऊ'-'कमला अक्का'ची हवा, पुण्यात पोस्टरबाजी
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 11:25 AM

पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य कित्येक वर्षांनंतरही शिळं झालं नाही. ताजं उदाहरण म्हणजे, तिकडे अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन (Joe Biden) यांनी शपथ घेतल्यानंतर इकडे पुणेकरांमध्येही उत्साह संचारला. जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देणारे पोस्टर पुण्यात झळकले आहेत. (Pune Man puts Poster to Congratulate US President Joe Biden Kamala Harris)

अमेरिकेत नाही, पण पुण्यात फ्लेक्स

अमेरिकीच्या अध्यक्षपदी जो बायडेन आणि उपाध्यक्षपदी कमला हॅरिस यांनी काल शपथ घेतली. त्यांनंतर अमेरिकेत लागले नसतील, पण  दोघांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स थेट पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ‘घासून नाय, तर ठासून आलोय’ असं लिहित पोपटराव खोपडे या पुणेकराने शुभेच्छा दिल्या.

भारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष

विशेष म्हणजे ‘जो भाऊ बायडेन’ आणि ‘कमला अक्का हॅरिस’ असा गावरान मराठी उल्लेख करत त्यांना पुणेरी पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारतीय वंशाच्या 14 मंत्र्यांची अमेरिकेत निवड झाल्याबद्दलही पोस्टरवर अभिनंदन करण्यात आलं आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत.

डोनाल्ड तात्या ट्रम्पही फेमस

याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘डोनाल्ड तात्या ट्रम्प’ असा सोशल मीडियावर भारतीय ट्रोलर्सकडून उल्लेख होत असे. ट्रम्प तात्या अशा नावाने सोशल मीडियावर मीम्स, व्हिडीओही शेअर केले जातात. ट्रम्प यांना मराठी डबिंग करुन भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत. आता ‘जो भाऊ बायडेन’ आणि ‘कमला अक्का हॅरिस’ यांची हवा असणार. (Pune Man puts Poster to Congratulate US President Joe Biden Kamala Harris)

जो बायडन यांचा शपथविधी

जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. मेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित होते. समारंभाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

152 वर्षांचा इतिहास मोडून डोनाल्ड ट्रम्प रवाना

जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

(Pune Man puts Poster to Congratulate US President Joe Biden Kamala Harris)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.