संकट काळात प्राणवायू, वारकऱ्यांची सेवा पण… एअर फोर्सच्या जवानाची मनाला चटका लावणारी एक्झिट

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सुट्टीवर आलेल्या भारतीय एअर फोर्सच्या जवानांचं आकस्मित निधन झालं आहे. कोरोना महामारीमध्ये प्राणवायू आणि वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या जवानाची अचानक एक्झिट मनाला चटका बसणारी आहे.

संकट काळात प्राणवायू, वारकऱ्यांची सेवा पण... एअर फोर्सच्या जवानाची मनाला चटका लावणारी एक्झिट
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 9:41 PM

पुण्यातील पुरंदर तालक्यातील दिवे गावातील स्क्वाड्रन लीडर विजयकुमार झेंडे यांंचं आकस्मित निधन झालं आहे. भारतीय एअर फोर्समध्ये कार्यरत असणारे स्क्वाड्रन लीडर यांच्या निधनामुळे दिवेगाव पंचक्रोशी आणि पुरंदर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय वायुसेनेमध्ये सोळा वर्षांपूर्वी जॉईंट झालेले विजयकुमार झेंडे काळाच्या पडद्याआड गेलेत. संपूर्ण लष्करी इतमामात विजयकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार दिवे येथे करण्यात आले.

कोरोना काळामध्ये जगात कोरोनाचे थैमान चालू असताना भारतात विमानाद्वारे ऑक्सिजन आणण्याचं काम विजयकुमार झेंडे यांनी केलं. तसेच भारत आणि रशिया या युद्धसरावात सहभाग घेऊन भारताचे नाव उज्वल केलं. सुट्टीच्या वेळी दिवे गावाला आल्यानंतर संपूर्ण कुटुंबासह कोकणात फिरायला गेले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे गावावरून जात असताना वारकऱ्यांचे दिंड्यांचे स्वागत आणि फराळाचं वाटप करत विजयकुमार यांनी आपल्या हातून वारकऱ्यांची सेवा केली.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते आजारी होते. डेंगू सदृश्य लागण झाल्यामुळे ते सासवड येथील रूग्णालयात गेले. तिथे त्यांना काही फरत जाणवला नाही. तब्येत आणखीनच ढासळल्यामुळे त्यांना पुणे येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही अखेरचा श्वास घेतला. विजयकुमार यांच्या आकस्मित निधनामुळे सर्व तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. सासवडचे आमदार संजय जगताप यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत विजयकुमार झेंडे यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, विजयकुमार ज्ञानोबा झेंडे यांच्यावर दिवे येथे संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एअर फोर्सचे सर्व अधिकारी कर्मचारी, पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ शेवटचा निरोप देण्यासाठी जमले होते.

Non Stop LIVE Update
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.