AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Gambling : जुगारींचं धाबं दणाणलं; आठवडाभरात पुणे पोलिसांनी छापे टाकून 12 जणांच्या आवळल्या मुसक्या

जुगार संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. जुगार खेळणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी कधी शाळकरी मुलेही यात गुंततात. जुगाराच्या ठिकाणांच्या आजूबाजूच्या घरात राहणार्‍या लोकांना या लोकांकडून धमकावले जाते आणि त्यांचा गैरवापर केला जातो.

Pune Gambling : जुगारींचं धाबं दणाणलं; आठवडाभरात पुणे पोलिसांनी छापे टाकून 12 जणांच्या आवळल्या मुसक्या
मोबाइल जुगार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: legitgamblingsites
| Updated on: Jun 10, 2022 | 10:31 AM
Share

पुणे : या आठवड्याच्या सुरुवातीला, पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने पार्वती दर्शन परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 12 जणांना जुगार (Gambling) खेळताना अटक केली. छाप्यांदरम्यान, पोलिसांनी 2 लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य जप्त केले आणि कल्याण मटका, व्हिडिओ गेम आणि मोबाइल जुगारामध्ये गुंतलेले जुगारी सापडले. जुगार खेळण्याच्या या नव्या पद्धती पोलिसांना (Police) अवगत झाल्याने गेल्या काही दिवसांपासून जुगारांवरील कारवाईत मोठी वाढ झाली आहे. सामाजिक सुरक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 7 जूनपर्यंत 22 छापे टाकून 175 जणांना अटक करण्यात आली आहे. त्या तुलनेत 2021मध्ये 21 छाप्यांमध्ये 194 आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आणि 2020मध्ये 11 छाप्यांमध्ये 69 आरोपींना अटक करण्यात आली. जुगार हा एक सामाजिक गुन्हा आहे ज्याचा परिणाम केवळ जुगारांच्या कुटुंबांवरच होत नाही तर परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनाही होतो.

कारवाई कठीण

पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या माहितीनुसार, मोबाइल जुगार हा जुगाराचा नवा प्रकार उदयास आला आहे. यामध्ये जुगार प्रमुख रिक्षा किंवा दुचाकीमध्ये बसून पैसे स्वीकारतात. जुगार खेळण्यासाठी मोबाइल फोन वापरतो. त्याला पोलिसांच्या हालचालीचा इशारा मिळताच तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतात. अधिकार्‍यांच्या मते, मोबाइल जुगाराच्या बाबतीत जुगाराच्या अड्ड्यांचा मागोवा घेणे कठीण आहे आणि काही वेळा पोलीस अधिकार्‍यांना मोबाइल जुगाराचे मूळ शोधण्यासाठी त्यांच्यापैकी एक म्हणून वेश धारण करावा लागतो. जुगारात वाहनांचा सहभाग असल्याची स्पष्ट पुष्टी झाल्याशिवाय या वाहनांच्या मालकांवर किंवा गुंतलेल्या लोकांवर फारशी कारवाई होऊ शकत नाही. दत्तवाडी हा पहिलाच छापा होता ज्यात मोबाइल मटका वाहन म्हणून वापरण्यात येणारी ज्युपिटर बाइक जप्त करण्यात आली होती.

मुलेही गुंतली

जुगार संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. जुगार खेळणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी कधी शाळकरी मुलेही यात गुंततात. जुगाराच्या ठिकाणांच्या आजूबाजूच्या घरात राहणार्‍या लोकांना या लोकांकडून धमकावले जाते आणि त्यांचा गैरवापर केला जातो. भीतीमुळे ते त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासही कचरतात. जुगाराचे अड्डे प्रामुख्याने लक्ष्मी नारायण टॉकीज स्वारगेट, बिबवेवाडी येथील पेट्रोल पंप, बाजार परिसर, दगडूशेठ हलवाईजवळ, ससून रुग्णालयाजवळ, बाणेर अशा परिसरात आहेत. कारवाई आणि त्यातील त्रुटींचा फायदा घेऊन जुगारी पार्किंग, झोपडपट्ट्या, बार आणि रेल्वे स्थानकांजवळील सावलीच्या ठिकाणी आपले अड्डे तयार करतात.

गेल्या काही महिन्यांत वाढ

गेल्या काही महिन्यांत जुगार खेळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल पोलीस उपायुक्त दर्जाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की लॉकडाऊनमुळे साथीच्या रोगाचा दैनंदिन कामावर परिणाम झाला होता. मात्र, आता सर्वच ठिकाणे खुली झाल्याने पुन्हा जुगार सुरू झाला आहे. सामाजिक सुरक्षा कक्षाने गेल्या तीन महिन्यांत 18-20 प्रकरणे नोंदवली आहेत. विविध ठिकाणी अनेकदा छापे टाकण्यात आले असले, तरी हा जामीनपात्र गुन्हा असल्याने जुगारी परततात. जुगार कायद्यात काही बदल करण्याची गरज आहे. शिवाय, लोकांनीही जागरूक राहून त्यांच्या भागात असे जुगार खेळणारे दिसल्यावर तक्रारी नोंदवाव्यात. आम्ही त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करू, असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.