होऊ दे खर्च..! पुणेकरांनी कोरोना लसीसाठी 141 कोटी मोजले, 35 टक्के नागरिकांची विकतच्या लसीला पसंती

कोरोना विषाण प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत देशात 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला. महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणात पुणे देखील अग्रेसर राहिलं आहे.

होऊ दे खर्च..! पुणेकरांनी कोरोना लसीसाठी 141 कोटी मोजले, 35 टक्के नागरिकांची विकतच्या लसीला पसंती
संग्रहित छायाचित्र.


पुणे : कोरोना विषाण प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत देशात 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला. महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणात पुणे देखील अग्रेसर राहिलं आहे. केंद्र सरकारनं ठरवलेल्या धोरणानुसार 75 टक्के लसी सरकारनं खरेदी केल्या तर 25 टक्के लसींची खासगी रुग्णालयांना विक्री करण्यात आली. पुणेकरांनी विकतच्या लसींसाठी 141 कोटी रुपये मोजले आहेत. पुण्यात 50 लाख डोसचा टप्पा पूर्ण झाला आहे.

35 टक्के पुणेकरांनी लसीसाठी मोजले पैसे

पुणे शहरात लसीकरणात 50 लाखापेक्षा जास्त डोसचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये 65 टक्के नागरिकांना मोफतची लस मिळाली आहे. तर, 35 टक्के पुणेकरांनी विकतची लस घेऊन स्वतःचे संरक्षण केले आहे. यासाठी पुणेकरांनी 1 अब्ज 41 कोटी 26 लाख 53 हजार 15 रुपयांचा खर्च केला आहे.

पुण्यात लसीकरणानंतर 26148 लोकांना कोरोना

पुण्यात कोरोना लसीकरणानंतर 26 हजार 148 लोकांना कोरोनांची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही डोस नंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुसऱ्या डोसनंतर बाधित होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. पहिल्या डोस नंतर 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली. तर, दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवडचं वायसीएम रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी वरदान

सरकारी रुग्णालयात सेवा मिळत नाही अशी ओरड कायम होते पण कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय म्हणजेच वायसीएम कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरल्याचे आकडेवरून स्पष्ट होतंय. रुग्णालयात दीड वर्षात कोरोनाच्या 46 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यादरम्यान 1676 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दाखल रुग्णांच्या संख्येत मृत्यूचे प्रमाण अवघे चार टक्के असून 96 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीय.

इतर बातम्या

कोरोना लसीचा अनोखा फायदा, इतर आजारामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण घटलं, नवी माहिती समोर

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

Pune thirty five percentage people bear money for corona vaccine 141 crore rupees spent to buy vaccine

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI