Pune Vasant More : महिनाभरापासून मनसेत हुकूमशाही सुरू; राज ठाकरेंच्या सभेआधीच वसंत मोरेंचा आरोप

Pune Vasant More : महिनाभरापासून मनसेत हुकूमशाही सुरू; राज ठाकरेंच्या सभेआधीच वसंत मोरेंचा आरोप
फेसबुक लाइव्ह करताना वसंत मोरे
Image Credit source: Facebook

वसंत मोरे निवडणुकीपूर्वी कांड करणार असे बोलले जात आहे. मात्र मला कांड करायचे असते तर आधीच केले असते. हे सर्व पार्ट टाइम जॉबवाले करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी स्वपक्षीय नेत्यांवर केला.

प्रदीप गरड

|

May 22, 2022 | 10:09 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा आहे. दुसरीकडे पक्षातले नेते वसंत मोरे यांनी काल फेसबुक लाइव्ह करत खळबळ उडवून दिली होती. पक्षातील पार्टटाइम लोक पक्षाची वाट लावत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. आज टीव्ही 9सोबत संवाद साधताना त्यांनी पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. तर काल 14 मिनिटं 30 सेकंदाचं फेसबुक लाइव्ह करून त्यांनी चुकीच्या बातम्या आमच्याबाबत पसरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप वसंत मोरे (Vasant More) यांनी केला आहे. माझ्यापेक्षा जास्त धक्का निलेश माझिरे यांना बसल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते. आपले सहकारी निलेश माझिरे मनसे सोडणार असल्याच्या अफवा असून यामुळे माझ्यापेक्षा जास्त धक्का निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांना बसल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते. 1 मिलियन लाइक्स घेणारा निलेश माझिरे यांच्या पुण्यातील कामाचे मोरे यांनी कौतुक केले. निलेश माझिरे एक शहर अध्यक्ष असून त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर गदारोळ झाला. कुणी या अफवा पसरवल्या हे मला माहीत नाही. पण खोट्या बातम्या पसरून निलेश माझिरेंना डावलण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केलंय.

‘वट काम करून बसवा’

आज टीव्ही नाइनसोबत त्यांनी संवाद साधला. आजपर्यंत कोणी पक्षात बोलत नव्हते. शहरात कोणालातरी वट बसवायचा आहे. मात्र अशा कारवाया करून वट बसवण्यापेक्षा काम करून तो बसवा, असा टोला त्यांनी स्वपक्षीय नेत्यांना लगावला आहे. पक्षात झारीतले शुक्राचार्य आहेत. राज ठाकरे यांनी विचारले तर नक्की सांगेन. पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. पक्षाचा ग्रुप आहे. पक्षात मतभेद असतात. मात्र त्याचे रुपांतर मनभेदात होताना दिसत आहे, ते न होण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

‘हे माझे दुर्दैव’

मागील महिनाभरापासून मला मी राजमार्गावर आहे हे सांगावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात आहे. अनेक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नाहीत. जे पक्षाचे पुण्यातील नेते आहेत, त्यांच्यापर्यंत मी अनेक गोष्टी घालत आहे. कोणीतरी अशी परिस्थिती निर्माण करत आहेत. कोण पक्षातून कोणाला घालवायला बघत आहे, ते शोधावे लागेल. तर वेळ आल्यावर पक्षातील नेत्यांची नावे उघड करणार असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले वसंत मोरे?

‘कांड करायचे असते तर आधीच केले असते’

वसंत मोरे निवडणुकीपूर्वी कांड करणार असे बोलले जात आहे. मात्र मला कांड करायचे असते तर आधीच केले असते. हे सर्व पार्ट टाइम जॉबवाले करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे, अशांना फोडून काढा, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. काहीजणांना पक्ष नाही, तर स्वत: मोठा व्हावा असे वाटत आहे. मान असा मिळत नसतो. तर झारीतील शुक्राचार्य कोण असे विचारले असता अशा कोणाशीच माझा संपर्क नसल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

वसंत मोरेंचे कालचे फेसबुक लाइव्ह

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें