मी बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी जातो ते काय ब्राह्मण म्हणून जातो काय? राज ठाकरेंचा पवारांवरही सवाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 5:16 PM

बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना.. 50 साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, असा गंभीर आरोपही राज यांनी यावेळी केलाय.

मी बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी जातो ते काय ब्राह्मण म्हणून जातो काय? राज ठाकरेंचा पवारांवरही सवाल

Follow us on

पुणे : मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच मी काय वाचतो आणि काय वाचलं पाहिजे हे मी आणि माझ्या पक्षाला माहीत आहे. मला कुणी मोजण्याचं काम करू नका, अशा शब्दांत राज ठाकरेंनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे. तसेच कुणाच्याही घरी आपण जात म्हणून जातो का? असा सवाल राज ठकरेंनी केला आहे. (Raj Thackarey reaction on sharad pawar’s comment on babasaheb purandare)

बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना.. 50 साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, असा गंभीर आरोपही राज यांनी यावेळी केलाय. राज ठाकरे पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

आजोबांचं लिखाण हवं तसं घेता येणार नाही

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचले आहेत… प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे. त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रबोधनकार परवडणार नाही

प्रबोधनकार तुम्हालाही परवडणार नाही. उगाच मध्ये मध्ये प्रबोधनकारांना आणू नका. त्यांना आणायचं तर पूर्ण आणा. म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही कोठे आहात ते, असंही ते म्हणाले. वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार? वरती जे ठरवतात तेच करावं लागतं. अजून तुमचं नशीब तुमच्या क्षेत्रात मीडियात अजून आरक्षण नाही, असं ते म्हणाले. (Raj Thackarey reaction on sharad pawar’s comment on babasaheb purandare)

संबंधित बातम्या

‘त्याचा’ संबंध काय हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं: राज ठाकरे

‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI