‘त्याचा’ संबंध काय हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं: राज ठाकरे

माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. (raj thackeray reply to sharad pawar on his comments)

'त्याचा' संबंध काय हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं: राज ठाकरे

पुणे: माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संबंध काय? हे मला एकदा शरद पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हान देतानाच मी प्रबोधनकारांची सर्व पुस्तके वाचली आहेत. तसेच यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. (raj thackeray reply to sharad pawar on his comments)

राज ठाकरे पाचव्यांदा पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. मी प्रबोधनकार ठाकरे पण वाचले अन् यशवंतराव चव्हाणपण वाचले आहेत. मी जे बोललो त्याच्या माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं, असं राज म्हणाले. मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

आजोबांचं लिखाण हवं तसं घेता येणार नाही

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला. यापूर्वी जातीजातीत मतदान व्हायचं. पण राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी. यावर मला सांगितलं जातं प्रबोधनकारांचं पुस्तक वाचा. मी सर्वांची पुस्तकं वाचले आहेत… प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे. त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

जात पाहून भेटत नाही

मी बाबासाहेब पुरंदरेंना भेटतो. ते शिवशाहीर म्हणून भेटतो. ब्राह्मण म्हणून भेटत नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सांगतानाच मी काय वाचतो आणि काय वाचलं पाहिजे हे मी आणि माझ्या पक्षाला माहीत आहे. मला कुणी मोजण्याचं काम करू नका, असं त्यांनी सांगितलं.

प्रबोधनकार परवडणार नाही

प्रबोधनकार तुम्हालाही परवडणार नाही. उगाच मध्ये मध्ये प्रबोधनकारांना आणू नका. त्यांना आणायचं तर पूर्ण आणा. म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही कोठे आहात ते, असंही ते म्हणाले. वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार? वरती जे ठरवतात तेच करावं लागतं. अजून तुमचं नशीब तुमच्या क्षेत्रात मीडियात अजून आरक्षण नाही, असं ते म्हणाले. (raj thackeray reply to sharad pawar on his comments)

संबंधित बातम्या:

दोन्ही डोस पूर्ण, तरीही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

VIDEO: फडणवीस मला कंटाळले म्हणून की काय त्यांनी मला दिल्लीत पाठवलं, राणेंना नेमकं काय म्हणायचंय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI