महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात स्वाभिमानी आक्रमक, साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

महाविकास आघाडी सरकारचा मित्रपक्ष असेलल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात स्वाभिमानी आक्रमक, साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलनाचा इशारा
राजू शेट्टी

सातारा: महाविकास आघाडी सरकारपुढील अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचा मित्रपक्ष असेलल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानीनं दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केलं होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वळवला आहे.स्वाभिमानीं सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानं एफआरपीचा नियम मोडल्याचा आरोप करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Raju Shetti said Swabhimani Shetkari Sanghatana will Protest Sugar mill of Minister Balasaheb Patil )

सह्याद्री साखर कारखान्यावर 22 मार्चला आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसाच्या एकरकमी एफआरपीच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. एक रकमी एफ.आर.पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजाराम बापू सह, साखर कारखाना, राजारामनगर (साखराळे )येथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता त्यांनी त्यांचा मोर्चा सातारा जिल्ह्याकडे वळवला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री कारखान्यानेच एफआपीचा नियम मोडला, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार

एकरकमी एफआरपीच्या मुद्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना सह्याद्री साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 22 मार्चला सह्याद्री कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचे दुसरे मंत्री स्वाभिमानीच्या निशाण्यावर

एकरकमी एफ.आर.पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जंयत पाटील यांच्या राजाराम बापू सह, साखर कारखाना येथे ठिय्या आंदोलन केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणारे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत. 8 मार्चला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राजाराम बापू सह, साखर कारखान्यावर आंदोलन केले असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं होते. अखेर राजू शेट्टींनी स्वत: कारखान्यावर जाऊन आंदोलन केले.

वीज बिलाचा प्रश्न आता नागरिकांनीच हातात घ्यावा

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणच्या थकबाकीदाराची वीज तोडणी सुरु करण्यात येईल असं जाहीर केले. वाढीव वीज बिलांच्या मुद्यावर नागरिकांनीच आक्रमक भूमिका घ्यावी, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

डोकं लावून स्वत:च केली वीजनिर्मिती, या शेतकऱ्याचा फोटो व्हीव्हीएस लक्ष्मणकडून शेअर

साखरेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

(Raju Shetti said Swabhimani Shetkari Sanghatana will Protest Sugar mill of Minister Balasaheb Patil )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI