AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Army Recruitment scam| लष्करभरती पेपर फुटी प्रकरण ; व्हेईकल मेकॅनिक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी सहसंचालक राजेशकुमार ठाकूरला अटक

जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स अर्थात जीआरईएफ विभागातील स्टोअर किपर टेक्निकल आणि मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर अर्थात व्हेईकल मेकॅनिक या पदांच्या परीक्षेसाठी हा पेपर होता. मार्चमध्ये पेपर तयार करण्यात आला तर 31 ऑक्टोबर 2021मध्ये ही परीक्षा पार पडली होती. सुरुवातीला 36 परीक्षार्थींना पेपर पुरविल्याच समोर आलं होतं.

Army Recruitment scam| लष्करभरती पेपर फुटी प्रकरण ; व्हेईकल मेकॅनिक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी सहसंचालक राजेशकुमार ठाकूरला अटक
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 22, 2022 | 9:51 AM
Share

पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police ) लष्कर विभागाचे दिल्लीतील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जॉईंट डायरेक्टर (Joint Director of Border Road Organization) राजेशकुमार दिनेशप्रसाद ठाकूर ( Rajesh Kumar Dinesh Prasad Thakur)यांना अटक करण्यात आलीये. त्यामुळे लष्कर विभागात खळबळ उडाली आहे. स्वतः पेपर सेट करणाऱ्या ठाकूर यांनीच पेपर फोडल्याच पिंपरी चिंचवड पोलिसांनी समोर आणले आहे. ठाकूर यांनी पेपर फोडण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती.

असा केला घोटाळा जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स अर्थात जीआरईएफ विभागातील स्टोअर किपर टेक्निकल आणि मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर अर्थात व्हेईकल मेकॅनिक या पदांच्या परीक्षेसाठी हा पेपर होता. मार्चमध्ये पेपर तयार करण्यात आला तर 31 ऑक्टोबर 2021मध्ये ही परीक्षा पार पडली होती. सुरुवातीला 36 परीक्षार्थींना पेपर पुरविल्याच समोर आलं होतं. आता तपासात हा आकडा वाढू साठवर पोहचला आहे. 4 जानेवारीला आर्मी ऍन्टीलिजेस ब्युरोने सापळा रचून तिघांना ताब्यात घेत, सांगवी पोलिसांकडे सुपूर्त केलं होतं.

ठाकूर यांना अटक केल्याने लष्कर विभागात खळबळ 

त्यावेळी निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता. श्रीराम कदमच्या संपर्कात जॉईंट डायरेक्टर ठाकूर आले होते. तेंव्हा ठाकूर दिघीतील लष्करी विभागात कार्यरत होते. तेंव्हाची ओळख कायम होती, त्यातूनच पुढे पेपर फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यासाठी ठाकूर यांनी पुणे विमानतळावर नऊ लाख रुपये स्वीकारले तर मुलाच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविले. अमेरिकेच्या हवॉर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सध्या त्यांचा मुलगा शिकतोय. त्याचा यात संबंध नसल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात दिसून येतंय. पण ठाकूर यांना अटक केल्याने लष्कर विभागात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.

Jay Bhim | सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाचा जगभरात डंका, आता थेट ऑस्करच्या शर्यतीत !

Samruddhi Highway| मराठवाड्यात समृद्धी महामार्गात अडथळा, नांदेड ते जालना रस्त्याविरोधात हायकोर्टात आव्हान!

Mumbai Fire : मुंबईतील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला आग, 15 जण जखमी; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत