बी.एड, एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ

आता बी.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी शुक्रवारपर्यंत आणि एम.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी बुधवारपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे.

बी.एड, एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ
प्रातिनिधीक फोटो

पुणे: बी.एड आणि एम.एड साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची तारीख सीईटी सेलकडून वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता बी.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी शुक्रवारपर्यंत आणि एम.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी बुधवारपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.(Registration date for B.Ed and M.Ed entrance exams has been extended)

सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्रात मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात शिक्षण क्षेत्रही मागे नाही. राज्यातील मोजक्याच शाळा सध्या सुरु आहेत. त्यातही 9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांचेच वर्ग सुरु आहेत. अशावेळी बी.एड आणि एम.एडच्या प्रवेश प्रक्रियेत मिळालेली मुदतवाढ विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

संबंधित बातम्या:

Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

Registration date for B.Ed and M.Ed entrance exams has been extended

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI