AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palkhi prasthan sohala 2022 : आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान; वाचा सविस्तर

संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून 21 जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवेल. त्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. 22) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील.

Palkhi prasthan sohala 2022 : आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान; वाचा सविस्तर
आषाढी वारी (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 11:05 AM
Share

आळंदी, पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा (Palkhi prasthan sohala 2022) 20 आणि 21 जून रोजी पार पडणार आहे. देहूवरून संत तुकाराम महाराजाची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार तर 21 जूनला आळंदी वरून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्त आळंदी, देहूत वारकऱ्यांची मांदियाळी होण्यास सुरुवात झाली आहे. माऊलींची वारी वारी 9 जुलैला पंढरपुरात पोहोचणार असून, आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. सोहळ्यात तीन उभे रिंगण, चार गोल रिंगण होणार आहेत. तिथीच्या वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, पुणे, सासवड, फलटणमधे प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील, अशी माहिती वारी, पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी दिली.

अडीच दिवसांचा मुक्काम

संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून 21 जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवेल. त्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. 22) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (ता. 24 व 25 जून), जेजुरीला (ता. 26 जून), वाल्हे येथे (ता. 27 जून), असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे (ता. 28 व 29 जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहोचेल. दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगाव (ता. 30 जून) मुक्कामी जाईल. फलटणला (ता. 1 व 2 जुलै), बरड (ता. 3 जुलै), नातेपुते येथे (ता. ४4 जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस येथे (ता. 5 जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माऊंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर (ता. 6 जुलै) मुक्कामी जाईल.

23 जुलैला सोहळा आळंदीत

ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील टप्पा येथे संत सोपानदेव व माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडीशेगाव (ता. 7 जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीतील (ता. 8) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील. वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला (ता. 9) प्रवेश करेल. आषाढी एकादशीला (ता. 10 जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर 13 जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी येणार आहे. 23 जुलैला सोहळा आषाढी वारी करून आळंदीत पोहचेल.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक

माऊलींच्या वारीतील रिंगण

– पहिले उभे रिंगण- चांदोबाचा लिंब

– पहिले गोल रिंगण- पुरंदवडे

– दुसरे गोल रिंगण- खुडुस फाटा

– तिसरे गोल रिंगण- ठाकुरबुवाची समाधी

– दुसरे उभे रिंगण- बाजिरावची विहीर वाखरी

– चौथे गोल रिंगण- बाजीरावची विहीर वाखरी

– तिसरे उभे रिंगण- पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.