समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, असा असणार प्रकल्प

pune chhatrapati sambhaji nagar samruddhi highway: मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे से छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राजमार्ग आतापर्यंत 'एनएचएआय' कडून बनवला जात होता. तो आता 'एमएसआयडीसी' कडून तयार केला जाणार आहे.

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, पुणे-नागपूर प्रवास होणार सुसाट, असा असणार प्रकल्प
Samruddhi Highway
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 11:12 AM

Samruddhi Highway News: महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ दरम्यान 53 किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.

किती येणार खर्च

समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरु होणार आहे. हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे. या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच फ्लायओव्हार अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी खर्च येणार आहे. यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 9565 कोटींवर जाणार आहे. पुणे ते समृद्धी महामार्गपर्यंतचा रस्ता 250 किलोमीटर असणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे से छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राजमार्ग आतापर्यंत ‘एनएचएआय’ कडून बनवला जात होता. तो आता ‘एमएसआयडीसी’ कडून तयार केला जाणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात ‘एमएसआयडीसी’ सोबत करार झाला होता. या मार्गामुळे केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चांगला संपर्क होणार नाही तर या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे समृद्धी महामार्गाची प्रगती

पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यानुसार, पीडब्ल्यूडी आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सर्व उपाययोजना करणार आहे. तसे झाले नाही तर एमओआरटीएच हा प्रकल्प आपल्या हातात घेईल. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंत झाला होता. त्याचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भर्वीरपर्यंत सुरु झाला. मुंबई नागपूर एक्स्प्रेस वेचा तिसरा आणि अंतिम टप्पा २०२४ च्या अखेरीस सार्वजनिक वापरासाठी पूर्णपणे खुला होईल.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.