AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024च्या विधानसभा निवडणुकीवरून राऊत यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; त्रिकुटांवर आरोप काय?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या 'त्रिकुटाने' शिवसेनेचा अकृत्रिम पराभव घडवला, असा आरोप त्यांनी केला.

2024च्या विधानसभा निवडणुकीवरून राऊत यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; त्रिकुटांवर आरोप काय?
gyanesh kumarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 11:24 AM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या त्रिकुटाने 2024 विधानसभा निवडणुकीत आमचा अकृत्रिम पराभव घडवून आणला आहे. ही निवडणूक शिवसेनाच जिंकली असल्याचं आता लोकांना पटू लागलं आहे, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात आले असता ते बोलत होते.

पुन्हा एकदा देशात वातावरण बदलतंय. ते पाहता मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. उद्धव ठाकरेंची आहे हे स्पष्ट होतंय. बाकी सर्व ड्युप्लिकेट आहेत. हा ड्युप्लिकेटचा खेळ सुप्रीम कोर्ट संपवणार आहे. सुनावणी करताना निवडणूक आयोगाने आणि तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने जी पापं केली, त्यामुळेच निवडणूक आयोगाविरोधात देशात अवडंबर उसळले आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

ताबडतोब निवडणुका झाल्या तर…

2024 मध्येही विधानसभेत शिवसेनाच जिंकली हे लोकांना पटू लागलं आहे. देशात भाजप कसा जिंकला? हे मिंधे, फडणवीस आणि ज्ञानेश कुमार यांचे त्रिकूटाचे कारनामे समोर आले आहेत. या त्रिकुटाच्या कारनाम्याने आमचा अकृत्रिम पराभव घडवला गेला. ज्ञानेश कु्मारचा निकाल लावला आणि आता ताबडतोब निवडणूक झाल्या तर मिंधे गट आणि भाजप औषधालाही राहणार नाही असं जनमत उसळलं आहे, असं राऊत म्हणाले.

फडणवीस, शिंदे का बोलत नाहीत?

जनतेच्या प्रश्नावर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार बोलत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक दिवसाआड दिल्लीत असतात. काय करतात माहीत नाही. राज्यात जमिनीवर काम करणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आहे, असं त्यांनी सांगितलं.

तुरुंगात जायला तयार

इंडिया आघाडीचा तीन दिवसापासून मोर्चा सुरू आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रतिनिधी दिसत नाहीत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही इंडिया आघाडीचे घटक आहोत. 6 तारखेला जो मोर्चा झाला, त्यात राहुल गांधींसोबत सर्वात पुढे मी होतो. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत आलो. दिल्लीचे कार्यक्रम अचानक ठरले. आमचे महाराष्ट्रातील कार्यक्रम शेड्युल होते. कालच माझं राहुल गांधींशी बोलणं झालं. 10 तारखेनंतर आम्ही मोकळे आहोत. दिल्लीत कितीही मोठं आंदोलन होऊ द्या, तुरुंगात जावं लागलं तरी चालेल आम्ही तयार आहोत. काही विशेष कारण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...