Pune : बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यात 12 वर्षीय मुलीने हिंमत करत सर्व सांगितलं, P.T. शिक्षकाने 2021 पासून…
बदलापूर घटनेनंतर राज्यभरातून अत्याचाराच्या घटना उजेडात येताना दिसत आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड येथील एका शाळेतील पी.टी. टीचरनेच १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीने हिंमत करत वर्ग शिक्षिकेला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

बदलापूर येथील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या आणखी घटना समोर येत आहेत. बदलापूर घटनेनंतर पुण्यातील पिंपरी- चिंचवड शहरामधून धक्कादायक घटना समोरील आलीय. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उजेडात आली आहे. पीडित मुलीने बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर मोठी हिंमत करत वर्गशिक्षिकेला सांगितलं. त्यानंतर जे काही समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शाळेमधील पी. टी. शिक्षकच आपल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता.
बदलापूर घटनेचे अद्यापही महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. बदलापूर च्या घटनेमुळं पीडित 12 वर्षीय मुलीने शिक्षकाने अत्याचार केल्याचं मोठ्या हिमतीने वर्ग शिक्षेकेला सांगितल्याने घटनेला वाचा फुटली. दोन वर्षे पीडित पी.टी. शिक्षकाच अश्लील कृत्य सहन करत होती. नराधम पी. टी. शिक्षक ज्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय. विद्यार्थ्यांचं शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राखण्याच काम पी.टी. शिक्षकांचं असत. पण नराधम निवृत्ती काळभोर ने ते बिघडवलंय.
2018 मध्ये देखील काळभोरन कीर्ती विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग केला होता. निगडी पोलिसात पॉस्को चा गुन्हा दाखल होता. तरीही शाळेच्या संस्था चालकांनी जुजबी कारवाई करत पुन्हा त्याला रुजू केलं. पीडित 2021 ते 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अल्पवयीन पीडित लैंगिक कृत्य सहन करत होती. कीर्ती विद्यालयाच्या संचालक कमिटीला देखील पोलिसांनी गुन्ह्यात अटक केलीय. ली. सोफिया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव याच्यासह कमिटीतील महिला सदस्याला देखील बेड्या ठोकल्यात. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतलाय. अशा घटनांमध्ये शिक्षकच आरोपी निघल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलू शकतो. त्यामुळे अशा घटनांना वेळीच पायबंध घालणं गरजेचं आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी पाठवलं जात आहे, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत असल्याने पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायला घाबरू लागले आहेत. बदलापूर घटनेनंतर अशी अनेक प्रकरणे आता समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
