AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझा जातीपातीच्या राजकारणाचा बळी, बिनकामाचा माणुस निवडून देत लोकशाहीची चेष्टा आणि थट्टा”

लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील शिरूर मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्यात लढत झाली. यामध्ये कोल्हे यांनी विजय मिळवला. तर आपल्या पराभवावर बोलताना बिनकामाचा माणुस निवडून लोकशाहीची चेष्टा केल्याचं आढळराव पाटील म्हणाले.

माझा जातीपातीच्या राजकारणाचा बळी, बिनकामाचा माणुस निवडून देत लोकशाहीची चेष्टा आणि थट्टा
Shivajirao Adhalarao Patil Amol Kolhe
| Updated on: Jun 08, 2024 | 6:56 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर महायुतीला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. काही जागांवर तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या उमेदवारांनी पक्ष बदलला पण तरीही यश मिळालं नाही. अशाच प्रकारे शिरूर मतदारसंघातही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदाही शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबाबत बोलताना  माझा जातीपातीच्या राजकारणाचा बळी गेल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीत विकासकामांना प्रधान्य न देता कामाचा माणुस आणि बिनकामाचा अशी लढत झाली. यामध्ये जातीपातीच्या राजकारणाची खेळी खेळली गेली त्यातच पराभव झाल्याचा खंत शिवाजी आढळरावपाटीलांनी व्यक्त केली. परावभवानंतरही न थांबता माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या जनतेसाठी काम करत रहाणार असल्याचे आढळरावपाटीलांनी जाहीरपणे सांगितलं.

2008 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. या मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवसेनेमध्ये असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील 2009 आणि 2014 मध्ये निवडून आले होते. मात्र 2019 ला राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होती. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्याने त्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला. मात्र त्यानंतर राजकी गणिती बदलेली दिसली.

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर आढळरावांनी शिंदे यांच्या बाजूने गेले. त्यानंतर राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी बंड केल्यावर महायुतीकडून ती जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली होती. तिकिटामुळे आढळरावांनी परत एकदा अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. शिरूरच्या जागेवर अजित पवार गट वि. शरद पवार गट अशी लढाई पाहायला मिळाली. मात्र शिरूरमध्ये तुतारी आढळरावांना पराभूत केलं आणि अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.