पक्षविरोधी काम केल्याचा ठपका, शिवसेनेकडून खेडमधील 6 सदस्यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या 6 सदस्यांनी सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल केला.

पक्षविरोधी काम केल्याचा ठपका, शिवसेनेकडून खेडमधील 6 सदस्यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव


पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या 6 सदस्यांनी सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. या प्रकरणी या 6 सदस्यांवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, सुनिता सांडभोर, वैशाली जाधव, अमर कांबळे आणि मच्छिंद्र गावडे अशी या पंचायत समिती सदस्यांची नावे आहेत (Shivsena demand to disqualify 6 Khed Panchayat Samiti members).

पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवण्यात शिवसेनेने या 6 सदस्यांना 7 दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवसेना पक्षाकडून कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. आता हा प्रस्ताव संमत झाल्यास या सदस्यांना 3 वर्षे कोणत्याही निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. पंचायत समिती सदस्य कार्यकाळ संपताच पक्षाकडून हक्कलपट्टी होऊ शकते.

खेड पंचायत समितीचा नेमका वाद काय?

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केलेय. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला 9 महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झालीय.

सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आलेय. सर्व पक्षीय 14 पैकी 11 सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातंय. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Shivsena demand to disqualify 6 Khed Panchayat Samiti members

हेही वाचा :

वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा वारू उधळला, आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत; राऊतांचा इशारा

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार : संजय राऊत

व्हिडीओ पाहा :

Shivsena demand to disqualify 6 Khed Panchayat Samiti members

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI