राजभवनातून 12 आमदारांची यादी गहाळ, गुन्हा दाखल करा; शिवसेना नेत्याची मागणी

राजभवनासारख्या अती महत्त्वाचा वास्तूमधून ही यादी गहाळ होणे हे अत्यंत दुर्दैवी, निंदनीय बाब आहे. | Rajbhavan

राजभवनातून 12 आमदारांची यादी गहाळ, गुन्हा दाखल करा; शिवसेना नेत्याची मागणी
राजभवन

पुणे: राजभवनातून विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित सदस्यांची यादी गहाळ झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पुण्यातील शिवसेना शहर प्रमुखांनी केली आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी राजभवनातील (RajBhavan) 12 आमदारांची यादी गहाळ होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Shivsena leader filed complaint over 12 MLC list get disappeared from Rajbhavan)

राजभवनासारख्या अती महत्त्वाचा वास्तूमधून ही यादी गहाळ होणे हे अत्यंत दुर्दैवी, निंदनीय बाब आहे. राजभवनातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. तसेच याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या निवेदनात करण्यात आली आहे.

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

12 आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही का निर्णय होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का? राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. त्यावर सहा-सात महिने निर्णय होत नाही. ही गोष्ट महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या लौकिकाला साजेशी नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचे भान ठेवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

12 आमदारांची यादी राजभवनात ‘सुरक्षित’

राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात (RajBhavan) सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र

सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच; राऊतांची खोचक टीका

(Shivsena leader filed complaint over 12 MLC list get disappeared from Rajbhavan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI