AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chakan fire : पुण्याच्या चाकणमधलं शॉपिंग सेंटर जळून खाक; शॉर्ट सर्किटमुळे पहाटे लागली होती आग

शॉपिंग सेंटरला लागलेली ही आग अत्यंत भीषण होती. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग काही वेळातच सर्वत्र पसरली. यावेळी आगीचे मोठमोठे लोट पाहायला मिळाले. यात लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे.

Chakan fire : पुण्याच्या चाकणमधलं शॉपिंग सेंटर जळून खाक; शॉर्ट सर्किटमुळे पहाटे लागली होती आग
आगीत खाक झालं चाकणमधलं शॉपिंग सेंटरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 1:36 PM
Share

चाकण, पुणे : खेड तालुक्यातील चाकण शहरातील एका शॉपिंग सेंटरला आग (Shopping center fire) लागल्याचा प्रकार आज घडला. चाकण शहराच्या मध्यवस्तीत हे शॉपिंग सेंटर आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र संपूर्ण शॉपिंग सेंटर आगीत जाळून खाक झाले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे (Short circuit) आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाकण माणिक चौक रामकृष्ण कॉम्प्लेक्स येथील रामदेव शॉपिंग सेंटर हे या आगीत जळून खाक झाले आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी चाकण नगरपरिषद अग्निशामक दल (Firebrigade) दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत येथील संपूर्ण दुकाने आगीत जळून खाक झाली.

लाखोंचे साहित्य जळून खाक

आग अत्यंत भीषण होती. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग काही वेळातच सर्वत्र पसरली. यावेळी आगीचे मोठमोठे लोट पाहायला मिळाले. यात लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.

आणखी वाचा :

Pune Sharad Pawar : अमृता फडणवीस यांचं नाव न घेता शरद पवारांचा निशाणा, मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून फटकारलं

Madhav Godbole passed away : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; पुण्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Pune Wrestling competition : ओमकार येलभर आणि कोमल शितोळे ‘मल्लसम्राट’; पुण्यातील शिरूरमध्ये उत्साहात झाली कुस्ती स्पर्धा

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.