Pimpri -Chinchwad | प्रत्येक जिल्ह्यात एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र निर्माण करण्याची गरज; दिव्यांगासाठी काम करण्यास कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pimpri -Chinchwad | प्रत्येक जिल्ह्यात एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र निर्माण करण्याची गरज; दिव्यांगासाठी काम करण्यास कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार
दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न
Image Credit source: TV9

या दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग व्यक्तीसाठी लागणारे विविध कृत्रिम अवयव निर्मिती होणार आहे . दिव्यांगाच्या कोशल्य विकासावर भर दिला पाहिजे. बदलत्या काळानुसार त्याच्या समोर अडचणी बदलत असतात. दिव्यांगासाठी महाशरद पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाशरद पोर्टल वर दिव्यांग बांधवांसाठी अनेक प्रकारच्या माहिती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

रणजीत जाधव

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 26, 2022 | 9:55 AM

पिंपरी – दिव्यांग व्यक्तींकडे सुपर पॉवर असती,निसर्ग आशा व्यक्तींना काही कमी दिल तर एकदी सुपर पॉवर देत असते. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी दिव्यांग पुनर्वसन केंद्र (Disability Rehabilitation Center)निर्माण करण्याची गरज आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)काम करण्यास कटिबद्ध आहे. विधानसभेच्या अधिवेशनामुळे महिनाभर मुंबई थांबावं लागलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रम झाले नाही , आता परत हे कार्यक्रम सुरू होतील.असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी व्यक्त केले.आज पिंपरी चिंचवडमधील जिल्हा रुग्णालय परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

दिव्यांगासाठी महाशरद पोर्टलची सुविधा

या दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग व्यक्तीसाठी लागणारे विविध कृत्रिम अवयव निर्मिती होणार आहे . दिव्यांगाच्या कोशल्य विकासावर भर दिला पाहिजे. बदलत्या काळानुसार त्याच्या समोर अडचणी बदलत असतात पिंपरी चिंचवड शहरात साठ एकर जागा सामाजिक न्याय विभागाची जमीन आहे मात्र त्यावर काही ठिकणी अतिक्रमण आहे ते काढून घेऊ. दिव्यांगासाठी महाशरद पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाशरद पोर्टल वर दिव्यांग बांधवांसाठी अनेक प्रकारच्या माहिती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या डोक्यातून गैरसमज दूर करावेत

तात्काळ दिव्यांगपण सापडलं तर त्यावर उपचार या केंद्रात होणार आहेत. दिव्यांगाचा ज्या मागण्या आहेत, तीन टक्के निधी ग्रामपंचायतपासून ते महानगर पालिकेपर्यंत वैक्तिक जो द्यायला पाहिजे. त्याच्या संदर्भात दिव्यांगाच म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या सर्वदूर संस्था तीन टक्के पैसे जे व्यक्तिगत दिव्यांगाचा द्यायचे असतात. ते आम्हाला मिळत नाहीत ही त्यांची मुख्य मागणी आहे. मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर फार सुधारणा केली आहे. ज्या संस्था पैसे आपल्याकडे ठेवायच्या आणि दिव्यांगा द्यायच्या नाहीत, त्यांना अस सांगितलं की तीन टक्के प्रमाणे जेवढे जिल्ह्यात, महानगर पालिका हद्दीत आहेत त्यांना ते पैसे दिले पाहिजेत. माझ्या सोबत या विभागाचे आयुक्त आहेत. अशा कुठल्या संस्था असतील त्यांना खड्या सारखे बाजूला काढा आणि दिव्यांगाचे दिव्यांना पैसे दिले पाहिजेत अशी सूचना देतो. दिव्यांगाना राज्यसरकारकडून विविध योजनामार्फत एक हजार रुपये देत आहोत. तरी, दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या डोक्यातून गैरसमज दूर करावेत असे आवाहन सांजवीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

Nagpur Crime | अजनीमध्ये Star कासवांची तस्करी, वन विभागाने तीन आरोपींना केली अटक

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!

कृषिमंत्री दादा भुसेंच्या कामांची ईडी, एसआयटी चौकशी करा; भाजपची व्हिडिओ लावून मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें