AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकबाकीची समस्या आहे? पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ घेऊन आलंय एक मिशन, वाचा सविस्तर…

बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांना ही समस्या कशी सोडवायची याची कायदेशीर माहिती नसते. तिथेच फेडरेशन पाऊल टाकते. बहुतेक प्रकरणे वैयक्तिक समस्यांमुळे होतात. अशा प्रकरणांमध्ये, आम्ही लोकांना समस्या सोडवण्याचा सल्ला देतो, परंतु वेळेवर या सर्व गोष्टी व्हायला हव्या, असे महासंघाचे म्हणणे आहे.

थकबाकीची समस्या आहे? पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ घेऊन आलंय एक मिशन, वाचा सविस्तर...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 30, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ (Pune District Co-Operative Housing Societies and Apartments Federation) या उन्हाळ्यात एका मिशन राबविणार आहे. सोसायट्यांना थकबाकीदारांच्या समस्येला सामोरे जाण्यास मदत करणे, हे ते मिशन असेल. त्यानुसार महासंघाने थकीत सोसायटीची थकबाकी वसूल करण्यासाठी सोसायट्यांना मदत करण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात जिल्हाभर विशेष कार्यक्रम आणि शिबिरांची (Camps) मालिका आयोजित केली आहे. महासंघ ही जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची सर्वोच्च संस्था आहे. देखभाल शुल्क भरणे हे सोसायटी सदस्यांचे मूलभूत कर्तव्य आहे, असे महासंघातर्फे सांगण्यात आले. हे शुल्क वेळेवर भरल्याशिवाय कोणतीही सोसायटी काम करू शकत नाही. कारण ती त्यांच्यासाठी उत्पन्नाचा (Income) प्राथमिक स्रोत आहे. दरम्यान, जवळजवळ 99 टक्के सदस्य त्यांच्या पेमेंटसह नियमित असल्याचे समोर आले आहे.

अनेक सोसायट्यांना नसते माहिती

बहुतेक गृहनिर्माण सोसायट्यांना ही समस्या कशी सोडवायची याची कायदेशीर माहिती नसते. तिथेच फेडरेशन पाऊल टाकते. बहुतेक प्रकरणे वैयक्तिक समस्यांमुळे होतात. अशा प्रकरणांमध्ये, आम्ही लोकांना समस्या सोडवण्याचा सल्ला देतो, परंतु वेळेवर या सर्व गोष्टी व्हायला हव्या, असे महासंघाचे म्हणणे आहे. क्रॉनिक डिफॉल्टर्सच्या बाबतीत, फेडरेशनकडे दोन वसुली अधिकारी आहेत, जे उपजिल्हा निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित थकबाकी वसूल करण्यात मदत करतात.

दुसरे कार्यालय होणार सुरू

आत्तापर्यंत महासंघाने पाषाण, पिंपळे सौदागर, सहकार नगर आणि इतर भागात अशा आठ कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यामुळे सोसायट्यांना समस्येचे निराकरण करण्यात मदत होईल. 1 मे रोजी पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात महासंघाचे दुसरे कार्यालय सुरू होणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील विविध भागांतील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. येत्या महाराष्ट्र दिनी हे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या चिखली या भागात सुरू होत आहे.

Follow Us
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा