पुण्यात TikTok स्टारची आत्महत्या, कोण होता समीर गायकवाड?

सोशल मीडियावरच्या अभासी जगात स्टार असलेल्या समीर गायकवाड याने रविवारी संध्याकाळी पुण्यातल्या राहत्या आत्महत्या केली. Tik tok Star Sameer Gaikwad Suicide, Who is Sameer gaikwad?

पुण्यात TikTok स्टारची आत्महत्या, कोण होता समीर गायकवाड?
पुण्यातील tik tok स्टार समीर गायकवाड याची गळफास घेत आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 11:34 AM

पुणे : सोशल मीडियावरच्या अभासी जगात स्टार असलेल्या समीर गायकवाड (Tik Tok Sameer Gaikwad) याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पुण्यातल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेमकरणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे परंतु ठोस कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही. (Tik tok Star Sameer Gaikwad Suicide, Who is Sameer gaikwad?)

शहरातील वाघोलीच्या केसनंद फाट्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) राहतो. आपल्या राहत्या घरी रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याने पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावून आपल्या आयुष्याचा दुर्वैवी शेवट केला.

समीरने गळफास लावल्याचं समजताच परिसरात धांदल उडाली. याचदरम्यान त्याला जवळच्या रुग्णालायात दाखल केलं गेलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अगदी काही क्षणात त्याने मृत्यूला कवटाळलं होतं.

“समीरने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे आणखी समजू शकलेलं नाही. पोलीस सर्व अंगाने तपास करत आहेत”, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी समीरचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोण होता समीर गायकवाड?

समीर गायकवाड हा Tik Tok या अॅपवर अतिशय लोकप्रिय होता. 22 वर्षीय त्याला हजारो लोक Tik Tok वर फॉलो करायचे. अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा. त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरायचे. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे.

‘रेड लाईट डायरी’जचे समीर गायकवाड वेगळे

दरम्यान, काही माध्यमं आत्महत्या केलेले समीर गायकवाड हे ‘रेड लाईट डायरीज’चे लेखक असल्याचं म्हणत आहेत. मात्र लेखक समीर बापू आणि टिकटॉक स्टार समीर गायकवाड हे दोन्ही वेगळे आहेत. पुण्यात आत्महत्या केलेल्या समीर गायकवाडने अशी कुठलीही सिरीज किंवा ब्लॉग लिहिला नाही. तो केवळ Tik tok व्हिडीओ बनवायचा.

लेखक समीर गायकवाड यांचे भन्नाट ब्लॉग

‘रेड लाईट डायरीज’चे लेखक समीर गायकवाड हे अतिशय ताकदीचे लेखक आहेत. रेड लाईट एरियामधल्या महिलांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समीर गायकवाड प्रयत्नशील असतात. समाजातल्या अनेक घडामोंडींवर ते बेधडकपणे लेखन करत असतात. ब्लॉगमधील विविध स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ते मूळचे सोलापूरचे आहेत.

हे ही वाचा :

धक्कादायक! कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण, दगड उचलून जीवे मारण्याचाही प्रयत्न

नवरदेवाला हळद लागताना घरात तिघांवर हल्ला, कल्याणमध्ये थरार, महिलेचा मृत्यू

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.