AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, रसायनशास्त्रातल्या योगदानाबद्दल दोन शास्त्रज्ञांना कांस्य पदकं; वाचा सविस्तर…

1999मध्ये स्थापन केलेले, CRSI रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील विविध स्तरांवर शास्त्रज्ञांनी केलेल्या योगदानाची दखल घेते आणि त्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान करते.

Pune : पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, रसायनशास्त्रातल्या योगदानाबद्दल दोन शास्त्रज्ञांना कांस्य पदकं; वाचा सविस्तर...
सुजीत घोष ( (IISER)/शाक्य सेन (NCL)Image Credit source: Express
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 11, 2022 | 8:53 PM
Share

पुणे : केमिकल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाने (CRSI) रसायनशास्त्रातील संशोधनातील योगदानाबद्दल पुण्यातील दोन शास्त्रज्ञांना कांस्य पदके प्रदान केली आहेत. CSIR-नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील (NCL) शाक्य सेन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमधील (IISER) सुजीत घोष हे या वर्षीच्या 30 राष्ट्रीय-स्तरीय पुरस्कार विजेत्यांमध्ये शहरातील दोन होते. 2014पासून पुण्यातील संशोधक शाक्य सेन आणि त्यांची टीम घटकांच्या अत्यंत कमी ऑक्सिडेशन अवस्थेच्या रसायनशास्त्रावर (Chemistry) काम करतात. तर सुजित घोष ज्यांचे मुख्य कार्य अकार्बनिक रसायनशास्त्रात आहे, ते रासायनिक उद्योगांमध्ये आणि पर्यावरणीय हेतूंसाठी वापरल्या जाणार्‍या प्रगत सच्छिद्र पदार्थांचा वापर करून धातू-सेंद्रिय फ्रेमवर्क विकसित करण्यावर कार्य करतात. 1999मध्ये स्थापन केलेले, CRSI रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील विविध स्तरांवर शास्त्रज्ञांनी केलेल्या योगदानाची दखल घेते आणि त्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान करते.

बनारस हिंदू विद्यापीठ आणि आयआयटीची बाजी

यावर्षी आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक विश्वकर्मा सिंग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूचे प्रोफेसर रामसेशा यांना दोन सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. बनारस हिंदू विद्यापीठाचे (BHU) प्रोफेसर केएन सिंग आणि इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे प्रोफेसर विद्युत घोष यांनी रौप्य पदक जिंकले. आयआयटीमधील कांस्यपदक विजेत्यांमध्ये भास्कर सुंदराजन (कानपूर), आदित्य पांडा आणि उत्तम मन्ना (गुवाहाटी), अमित कुमार (पाटणा), बिस्वरूप पाठक (इंदूर), देबासिस बॅनर्जी आणि एम शंकर (रुरकी), आर कोठंदरमन (मद्रास), आर. रॉडनी फर्नांडिस (बॉम्बे) आणि टीसी नागय्या (रोपर) यांचा समावेश आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विजेत्यांमध्ये मधुरिमा जना (रूरकेला), वेलमठी (तिरुचिरापल्ली) आणि देबश्री चक्रवर्ती (सुरथकल) यांचा समावेश आहे.

आयआयएसईआरचे विजेते

आयआयएसईआरचे विजेते प्रो. जे. शंकर आणि अभिजित पात्रा (भोपाळ), दिव्येंदू दास आणि प्रसून मंडळ (कोलकाता), एसए बाळू (मोहाली), जयदीप लाहा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद आणि पी. सी. रवी कुमार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, भुवनेश्वर विजेते ठरले.

इतर पदक विजेते कोण?

इतर पदक विजेते सीएसआयआर-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन, जम्मूचे डी मुखर्जी होते. सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद येथील प्रथमा माईनकर, CSIR-ईशान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, जोरहाटमधील स्वप्नील हजारिका, भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथील केआरएस चंद्रशेखर; हैदराबाद विद्यापीठातून प्रदीप के पांडा यांनी पदके जिंकली.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान