AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी अहंकारी, पुढील ‘इतकी’ वर्षे देशात भाजपचं शासन असणार, अमित शाहांचं मोठं विधान

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी अहंकारी, पुढील 'इतकी' वर्षे देशात भाजपचं शासन असणार, अमित शाहांचं मोठं विधान
Union Home minister Amit Shah
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 21, 2024 | 5:35 PM
Share

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना माझा नमस्कार, मी पुण्यनगरीत आलो असून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा प्रणाम. जे विजयी होतात त्यांचं सरकार बनतं. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हरल्यावरही अहंकार आहे. भाजपच्या नेतृत्त्वात येत्या निवडणूकीमध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. आपण सत्ता मिळवण्याच्या हेतूने काम करणारे लोक नाही आहोत. विचारधारेला घेऊनच भाजप पार्टीची स्थापना केली आहे. देशात आणखी 15 वर्षे भाजपचे सरकार राहणार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण भेटतं. पण शरद पवार यांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण भेटलं होतं, मात्र शरद पवार सत्तेत आल्यावर ते आरक्षण गायब झालं. भ्रष्टाचारांचा सर्वात मोठा सरदार म्हणजे शरद पवार असल्याचं म्हणत अमित शाह यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे हे औरंगबजे फॅनक्लबचे नेता आहेत. ते बाळासाहेबांचा वारसदार असल्याचं बोलतात पण कसाबला बिर्याणी देण्याची मागणी करणाऱ्यांसोबत जाऊन बसलेत. छत्रपती संभाजीनगर नामांतराल विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत शाहांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

काँग्रेस देशात चुकीचा प्रचार करत आहेत. गेल्या १० वर्षा आम्ही गरिबांचं कल्याण करण्याचं काम केलं आहे. काँग्रेस कधीही गरिबांचं कल्याण करू शकत नाही. भाजप संविधान संपवणार असल्याचा चुकीचा विचार केला. बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान इंग्रजांनी जेवढा नाही केला तेवढा अपमान काँग्रेसनी केला. समाजीतील प्रत्येक वर्गासाठी आम्ही काम केलं असल्याचं अमित शाह म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक योजना भाजपने पूर्ण केल्या. मोदींच्या काळात भरपूर विकासकामे झालीत. शरद पवार आता विकासाची वेळ गेल पुन्हा संधी नाही. महाराष्ट्र आणि हरियाणा जिंकल्यावर राहुल गांधी यांचा अहंकार मोडेल, असंही शाहा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...