Pune : पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बसण्यास बंदी; पण अविवाहित जोडपी कशी ओळखणार?

हा परिसर अत्यंत विस्तीर्ण आणि दाट झाली असलेला आहे. मात्र सुरक्षेच्या (Security) दृष्टीकोनातून हा परिसर म्हणावा तितका सक्षम नाही. सुरक्षारक्षक अत्यंत कमी आहेत.

Pune : पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बसण्यास बंदी; पण अविवाहित जोडपी कशी ओळखणार?
पाषाण लेक परिसर (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: punetourism
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 12:43 PM

पुणे : पाषाण तलाव परिसरात (Pashan Lake area) अविवाहित जोडप्यांना बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाषाण सुतारवाडी रस्त्यावर हा पाषाण तलाव आहे. तलावाच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. पुणे महापालिकेने (Pune municipal corporation) याठिकाणी उद्यान विकसित केले आहे. याठिकाणी काही गैरप्रकार घडत असल्यामुळे जोडप्यांना आतमध्ये सोडले जात नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे. हा परिसर अत्यंत विस्तीर्ण आणि दाट झाली असलेला आहे. मात्र सुरक्षेच्या (Security) दृष्टीकोनातून हा परिसर म्हणावा तितका सक्षम नाही. सुरक्षारक्षक अत्यंत कमी आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये केवळ एकच सुरक्षारक्षक काम करत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

‘ज्येष्ठ नागरिकांना आक्षेप’

पाषाण तलाव परिसर विस्तीर्ण आणि दाट झाडी असून निसर्गरम्य परिसर आहे. मोठ्या प्रमाणात याठिकाणी तरुणाई येताना दिसते. त्यात विवाहित जोडप्यांसह अविवाहित जोडप्यांचीही वर्दळ पाहायला मिळते. मात्र याठिकाणी काही गैरप्रकार होत असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. अविवाहित जोडपी याठिकाणी आल्यानंतर त्यांचे वेगवेगळे प्रकार सुरू असतात, असे येथील सुरक्षारक्षकाने सांगितले. यावर ज्येष्ठ नागरिकांना आक्षेप आहे. त्यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असेही सुरक्षारक्षकाने सांगितले.

‘पोलिसांतही अनेक वेळा गेल्या तक्रारी’

अविवाहित जोडपी आणि येथील स्थानिक नागरिक यांच्यात अनेक वादाची प्रकरणे याआधी झाली आहेत. पोलिसांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत. येथे सुरक्षेचा मोठा मुद्दा आहे. जर ग्रुपने मुले आली, तर आमच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सुरक्षारक्षकाने केला आहे. अनेकवेळा ही जोडपी आक्रमक असतात, मोठमोठ्याने बोलत अंगावर धावूनही येतात. अशांना उत्तर देणे अवघड होऊन बसते, अशी भिती सकाळच्या सत्रातील सुरक्षारक्षकाने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

जोडप्यांना ‘नो एन्ट्री’

‘निर्णय विचारपूर्वक घेतले जावेत’

पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी घातली. मात्र अविवाहित जोडपी ओळखायची कशी, असा सवाल केला जात आहे. याठिकाणची वर्दळ पाहता सरसकट अशाप्रकारचे निर्णय घेताना विचारपूर्वक घेतले जावेत, येथील सुरक्षा वाढवावी, अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.