AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Death : नीलेश चव्हाण अजून सापडला का नाही? पोलिसांना पडला का मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा विसर, लपला तरी कुठे?

Nilesh Chavan Fugitive : वैष्णवी हगवणे प्रकरणातील एक आरोपी नीलेश चव्हाण अद्याप पसार आहे. त्यावरून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर पोलिसांनी यापूर्वी वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित एक जीव वाचला असता अशी चर्चा होत आहे.

Vaishnavi Hagawane Death : नीलेश चव्हाण अजून सापडला का नाही? पोलिसांना पडला का मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा विसर, लपला तरी कुठे?
नीलेश चव्हाण लपला कुठे?Image Credit source: गुगल
Updated on: May 24, 2025 | 9:10 AM
Share

पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात सासू-सासरा, नवरा, नणंद आणि मोठा दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला होता. जमीन खरेदीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी करत तिला जाच करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ कस्पटे कुटुंबांना मिळू नये यासाठी हगवणे कुटुंबियांनी ते लपवल्याचे आता उघड झाले आहे. याप्रकरणात एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले आहे. तर याप्रकरणातील एक आरोपी नीलेश चव्हाण हा पसार आहे. चव्हाण कुठे लपला याची चर्चा होत आहे. पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कस्पटे कुटुंबियांना दाखवला पिस्तुलाचा धाक

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिचे बाळ नीलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मुलाचा ताबा घेण्यासाठी कस्पटे कुटुंब त्याच्याकडे गेले होते. त्यावेळी कस्पटे कुटुंबियांना त्याने पिस्तुलाचा धाक दाखवला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल जाल्यापासून नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) हा अद्याप पसार आहे. पोलीस त्याच्या घरी गेले होते. पण तो सापडला नाही.  त्याच्या घरावर आणि भावाला नोटीस देण्यात आली आहे. त्याची पिस्तुल अजून सापडलेली नाही. त्याचा मोबाईलही सापडलेला नाही.

बाळाचा तुमचा संबंध काय?

वैष्णवी यांचे वडील अनिल कस्पटे आणि त्यांचे कुटुंब वैष्णवी यांच्या बाळाला आणण्यासाठी हगवणे यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांना ते बाळ चव्हाणकडे असल्याचे समजले. ते बाळ आणण्यास गेल्यावर चव्हाणने त्यांना पिस्तूल दाखवत ‘तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही. तुम्ही येथून चालते व्हा,’ अशी धमकी दिली. नीलेश हा वैष्णवी यांचा पती शशांक हगवणेचा मित्र आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेशाची पोलिसांना आठवण आहे का?

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊनही पोलीसांना चव्हाण सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी निदान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाची तरी आठवण आहे का? असा सवाल केल्या जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे समजते. वैष्णवीच्या मृत्यूनंतर त्यांचे बाळ चव्हाण यांच्याकडे होते. या प्रकरणाचा तपास वारजे पोलीस करीत आहेत.

तांबडा-पांढरा हॉटेलमध्ये मटणावर ताव

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे कारला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती लागला. मात्र 17 मे या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही बापलेक फरार होते हे बाप लेक फरार असताना मावळ तालुक्यातील याच तांबडा पांढरा या हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना एक सीसीटीव्ही समोर आला आहे. या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी राजेंद्र हगवणे हा मटणावर आपल्या मित्रांसोबत ताव मारताना दिसत होता. त्यानंतर याच हॉटेल बाहेरील सीसीटीव्ही मध्ये जी थार काल बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. ती याच ठिकाणावर आढळून आली होती.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.