AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राज्याच्या सत्ता संघर्षाचा ‘निक्काल’ कधी?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तारीखच सांगितली

एक महिना होत आला तरी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अजून निकाल दिला नाही. त्यामुळे या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षाचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कोर्टाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मोठी बातमी ! राज्याच्या सत्ता संघर्षाचा 'निक्काल' कधी?; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी तारीखच सांगितली
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 08, 2023 | 8:47 AM
Share

पुणे : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ महाराष्ट्रासाठीच महत्त्वाचा नाही तर देशातील भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी ही मार्गदर्शक असाच ठरणारा असणार आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन महिना होत आला तरी अजून कोर्टाने निकाल दिलेला नाही. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्येही धाकधूक निर्माण झाली आहे. या निकालावर राज्यातील सत्ताकारणाचं भवितव्य ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकालाची तारीख अजून जाहीर केलेली नाही. मात्र, राज्यातील सत्तासंघर्षवर 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची टीव्ही 9 मराठीला दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून तशा हालचाली सुरू झाल्याची माहितीही बापट यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या 11 मे रोजी काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लवकरच निकाल लागेल

दरम्यान, प्रसिद्ध वकील उज्जवल निकम यांनीही राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे आता जरी सांगणे कठीण असले तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायाधीश निवृत्त होत असल्याने हा सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा आहे, असं उज्जव निकम म्हणाले.

निकम यांना राजकारणात येणार का? असा सवाल केला असता त्यांनी नाही असं म्हटलं. सध्यातरी माझा राजकारणात येण्याचा विचार नाही. कारण सध्या राजकारणात जी अस्थिरता आणि गढुळता आहे, ती पाहता माझ्यासारख्या व्यक्तींनी राजकारणात येणं योग्य नाही, असं माझं मन सांगत आहे, असं निकम म्हणाले.

आठवडा महत्त्वाचा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सत्ता संघर्षावर भाष्य केलं होतं. येणारा आठवडा महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा ठरणार असून या आठवड्यात अनेक राजकीय घटना घडतील. जनेतला लुटण्याचे काम आणि 105 सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपाने राज्यात तमाशा केलाय, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

10 तारखेनंतर निकाल

प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनीही सत्ता संघर्षावर भाष्य केलं आहे. येत्या 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येईल. 10 तारखेनंतर सत्तासंघर्षवर निकाल येण्याची शक्यता आहे, असं असीम सरोदे यांनीही म्हटलं होतं. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.