आरोप करताना नि कोर्टात पेपर सादर करताना किती फरक, अनिल देशमुख यांच्या जामिनावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
सहा महिने झाले, तरी तेवढचं संरक्षण का, असा सवाल रोहित पवार यांनी व्यक्त केली.

कर्जत : ईडी, सीबीआयच्या वतीनं अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोपपत्र दिलं गेलं होते. लोकांना सांगण्यासाठी १०० कोटी रुपयांचा आरोप केला गेला होता. पण, कोर्टात पेपर दाखल करताना काही लाखातच ही गोष्ट आहे. हा युक्तिवाद सादर केला गेला तेव्हा तारीख पे तारीख देण्यात येत होती. काही कारणाअभावी कोर्टाला वेळ देता आली नसेल. युक्तिवाद झाला. आता त्यांना जामीन मिळालेलं आहे. दहा दिवसांची स्थगिती आहे. ती एक लिगल प्रक्रिया आहे. दहा दिवसानंतर ते लोकांबरोबर असतील. कुटुंबाबरोबर असतील. कुटुंबावर खूप मोठा परिणाम झाला. न्यायालयानं विश्वास सार्थ ठरवला, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
माझ्या विचाराचं सरपंच निवडून दिला नाही. तर निधी देणार नाही, अशी धमकी नितेश राणे यांनी दिली. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, ही प्रवृत्ती आणि विचार भाजपचा आहे. अशा पद्धतीनं वागत आहेत. हा विचार बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातले काही लोकं बोलत होते. तेव्हा ते शांत बसले होते.
कर्नाटक, गुजरातात प्रकल्प गेले. तेव्हा हे सर्व शांत बसले होते. मी व्यक्तिगत बोलणार नाही. पण, भाजपच्या विचारांच्या लोकांची सर्वांचीच ही प्रवृत्ती आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार असताना निवडणुका डोळ्यासोर असताना शांत होते, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
निर्भया पथकाच्या गाड्या आमदारांना दिल्या आहेत. हे सरकार लोकांच्या हितासाठी चालतं की, ४० आमदारांसाठी हे कळतं. निर्भया पथकाच्या गाड्या हा महिलांच्या सुरक्षेसाठी असतात. पण, प्रत्येक आमदारांना पाच पोलीस, घरी दोन पोलीस दिले गेले आहेत. सहा महिने झाले, तरी तेवढचं संरक्षण का, असा सवाल रोहित पवार यांनी व्यक्त केली.
महिलांच्या सुरक्षेचं काय. शक्ती कायदा राज्यातून केंद्रात पाठविला. तो केंद्र सरकारनं पास केला नाही. हे लोकं लोकांचा विचार न करता सत्ता कशी टिकेल, याचाचं विचार करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.
