Pimpri Chinchwad police | पिंपरी चिंचवडमध्ये 400 हून अधिक पोलिसांना वर्क फ्रॉम होम, काय करणार काम?

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास , डायलेसिस यासारखे आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी ही सुविधा राबवली जाणारा आहे.वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे .

Pimpri Chinchwad police | पिंपरी चिंचवडमध्ये 400 हून अधिक पोलिसांना वर्क फ्रॉम होम,  काय करणार काम?
Pimpri Chinchwad police

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. कोरोनापासून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करताना पोलिसांच्या सुरक्षेसाठीही उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोना व ओमिक्रॉनचा वाढत संसर्ग लक्षात घेता पिंपरी चिंचवड पोलिस प्रशासन सर्तक झाले आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या 55 वर्ष वयाच्या पुढील पोलिस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचा विचार सुरु आहे. वर्का फ्रॉम होम द्यायचे झाले तर पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालयातील 403  पोलीस कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावे लागणार आहे.

एकूण मनुष्यबळ किती पिंपरी चिंचवड पोलीस स्थानकात सद्यस्थितीला तीन हजार 275  पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील403  पोलीस 55  वर्षे वयातील आहेत. तर 355 पोलीस कर्मचारी 55 वय वर्षे ओलांडलेले आहेत. यात 305  सहायक फौजदार तर 55 हवालदार आहेत.

सूचना आल्यानंतर अंमलबजावणी करणार वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पोलीस दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास , डायलेसिस यासारखे आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी ही सुविधा राबवली जाणारा आहे. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर घनवट यांनी दिली आहे.

55 च्या पुढील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिल्यानंतर , तरुण पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिल्यानंतर कोणत्या स्वरूपाचे काम दिले जाणारा आहे. याबाबतही अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही.

‘शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, पटोलेंची खोचक टीका

Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे?

‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून एक मार्क्स पॉलिसी रद्द; विद्यार्थी, पालकांनी केले निर्णयाचे स्वागत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI