AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक बँकेचे होणारे प्रमुख अजय बंगा यांचे काय आहे पुणे कनेक्शन

अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवले आहे. त्यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत.

जागतिक बँकेचे होणारे प्रमुख अजय बंगा यांचे काय आहे पुणे कनेक्शन
अजय बंगा
| Updated on: Feb 24, 2023 | 2:13 PM
Share

पुणे : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाची शिफारस केली. भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक, अर्थतज्ज्ञ असलेले अजय बंगा यांचे नाव येताच देशभर चर्चा सुरु झाली. अजय बंगा यांचे महाराष्ट्राशी आणि पुण्याशी नाते आहे. त्याबद्दल आता पुणेकरांना अभिमान वाटणार आहे. भारत सरकारने २०१६ मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. जागतिक बँकेचे विद्यमान प्रमुख डेव्हिड मालपास यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ मध्ये संपुष्टात येणार होता पण त्याआधीच त्यांनी पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला.

कोण आहे अजय बंगा

६३ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला. त्यांचे वडील हभजनसिंग बंगा भारतीय लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झाले. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते, त्यावेळी अजय यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे. शालेय शिक्षणानंतर अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए केले.

३० वर्षांचा अनुभव

जागतिक बँकेनं हवामान बदलाबाबत (Climate Change) ठोस पावलं उचलावी, यासाठीचा पाठपुरावा अमेरिका सातत्यानं करत आहे. त्याचवेळी अजय बंगा यांचं नाव अमेरिकेनं सूचवले आहे. त्यांनी दशकभराहून अधिक काळ मास्टरकार्ड या क्रेडीट कार्ड कंपनीचं नेतृत्त्व केलं. ते सध्या एका खासगी इक्विटीमध्ये काम करत आहेत. यापुर्वी सिटीग्रुपच्या अशिया-पॅसिपिक रिजनचे सीईओ होते.

नेस्लेमधून केली सुरुवात

1996 मध्ये सिटीग्रुपमध्ये जाण्यापुर्वी बंगा 1981 मध्ये नेस्ले कंपनीतून आपल्या करियरची सुरुवात केली. भारतात त्यांनी 13 वर्षे काम केले. पेप्सिकोमध्ये दोन वर्ष त्यांनी काम केले. त्याचबरोबर अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स व Dow Inc.मध्येही त्यांनी काम केले. त्यांना सामाजिक विकास विषयात रुची आहे.

बाराक ओबामासोबत केले काम

2015 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर त्यांनी काम केले. व्यापार धोरणासंदर्भात ते त्यांचे सल्लागार होते. जागतिक बँक जगभरातील 189 देशांचे नेतृत्व करते. बँकेच्या उद्देश जगभरातील गरिबीचे निर्मूलन करणे हा आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.