Rahul Gandhi : ‘मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला…’, काय म्हणाले राहुल गांधी?
Rahul Gandhi : "त्यांना निवडणुकीत निवडक लोकांना फायदा पोहोचवायचा आहे. मागासांनी मागास, दलित दलित रहावेत अशी त्यांची इच्छा आहे. जातीचा रचना जशी आहे, तशीच रहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही आमच्या दोघांमध्ये लढाई आहे"
“तुम्ही भाजपवाल्यांना घाबरवून सोडलय. इथे येऊन मला आनंद होतोय. पंतगराव कदम यांच्या प्रेमाखातर आलो. विकास, शिक्षणाच काम त्यांनी केलं. काँग्रेस पक्षासोबत पूर्ण मनापासून आयुष्यभर उभे राहिले. इंदिरा गांधी निवडणुक हरल्यानंतरही पंतगराव कदम त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र प्रगतीशील राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या या सर्वांनी फक्त महाराष्ट्रालाच नाही संपूर्ण देशाला प्रेरणा दिली” असं राहुल गांधी म्हणाले. ते सांगली येथे बोलत होते.
“मी खर्गेजीना आज बोललो. काँग्रेस अध्यक्ष आहेत. आम्ही लँड केलं. मी एक गोष्टी नोटीस केली आहे. मी तुमच्यासोबत कर्नाटकाला येतो, तेव्हा तुम्ही खुश होता. तुम्ही महाराष्ट्रात येता, तेव्हा सुद्धा आनंदी असता, एकासेकंदात त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. त्यामुळे मी इथे येतो, तेव्हा आनंदी असतो. माझी सुद्धा तीच भावना आहे” असं राहुल गांधी म्हणाले.
‘आम्हाला सर्वांना जोडून पुढे न्यायच आहे’
“मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला असं वाटत हा प्रदेश आमच्या विचारधारेचा गड आहे. तुमच्या डीएनएमध्ये ही विचारधार आहे. तुम्ही देशात आज भारतात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकाबाजूला काँग्रेस पार्टीची विचारधारा दुसऱ्याबाजूला भाजपा आहे. आम्हाला सामाजिक विकास हवा आहे. आम्हाला सर्वांना जोडून पुढे न्यायच आहे. त्यांना निवडणुकीत निवडक लोकांना फायदा पोहोचवायचा आहे. मागासांनी मागास, दलित दलित रहावेत अशी त्यांची इच्छा आहे. जातीचा रचना जशी आहे, तशीच रहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही आमच्या दोघांमध्ये लढाई आहे” असं राहुल गांधी म्हणाले.
‘एकाजातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावतात’
“ते द्वेष पसरवतात. एका धर्माला दुसऱ्या धर्माशी, एकाजातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावतात. मणिपूर बघा, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. दीडवर्ष झालं भारताचे पंतप्रधान तिथे गेले नाहीत, कारण तिथे भाजपाच्या लोकांनाी आग लावली आहे” असं राहुल गांधी म्हणाले.