AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोगस डॉक्टरने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, महिलेची प्रकृती चिंताजनक, रायगडमधील धक्कादायक प्रकार

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या एका बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुणीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बोगस डॉक्टरने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, महिलेची प्रकृती चिंताजनक, रायगडमधील धक्कादायक प्रकार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2025 | 4:25 PM
Share

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातल्या एका बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुणीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्याने महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होऊन, तिची प्रकृती चिंताजनक बनली. या प्रकरणी संबंधित बोगस डॉक्टरविरुद्ध तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष नारायणकार यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, या घटनेसंदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गर्भपात करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील एक महिला खासगी दवाखान्यात गेली होती, मात्र तेथील बोगस डॉक्टर शंकर कुंभार याने कोणतीही वैद्यकीय चाचणी किंवा सोनोग्राफ़ी न करता तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे  या गोळ्यांचा परिणाम उलटा झाला आणि तरुणीला अवाजवी रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागले. काही वेळाने तिची प्रकृती खालावत गेली, तेव्हा नातेवाइकांनी तिला तातडीने तालुका उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

गर्भपाताच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने आणि अयोग्य प्रमाणात देण्यात आल्यानेच महिलेला हा त्रास झाल्याचे तपासात उघड झाले आहे.  या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे , ज्यामध्ये बोगस डॉक्टरवर फसवणूक आणि महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार कुडगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे समोर आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचा बाजार मांडणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, संबंधित बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.