रायगडमध्ये ‘कोरोना’चं थैमान सुरुच, नवी मुंबईतही विस्फोट; वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढलं

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून मंगळवारी 702 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

रायगडमध्ये ‘कोरोना’चं थैमान सुरुच, नवी मुंबईतही विस्फोट; वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:37 AM

नवी मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढतोय. नवी मुंबई (Navi Mumbai) आणि रायगडमध्ये (Raigad) कोरोनाचे (Corona Cases) रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. मंगळवारी नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 72 वर पोहोचली आहे तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 3404 आहे.  दिवसभरात 47 रुग्ण बरे झाले आहेत. रायगडमध्ये मंगळवारी 702 रुग्णांची नोंद झाली आहे. रायगडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात 48 रुग्ण बरे झाले आहेत.

नवी मुंबईत 1072 रुग्णांची नोंद

नवी मुंबईत मंगळवारी 1072 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू दिवसभरात झालेला नाही. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये धान्य, मसाला, फळे, भाजीपलाआणि कांदा बटाटा मार्केट आहे या बाजार आवारात मोठा प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. लोक न मास्क वापरतात ना सोशल डिस्टनसिंग पालन करतात.

एपीएमसी मार्केटमधील चाचण्या वाढवणार

एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजारात प्रवेश करणाऱ्या घटकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मात्र, सध्या होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. आगामी काळात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सध्या जवळपास 1000 गाड्याची आवक सुरु आहे.

आयक्तांचं टेन्शन वाढलं

नवी मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने महापालिका आयुक्तांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात 1500 बेड अ‌ॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. आयुक्त अभिजित बांगर कोरोना नियंत्रण आणण्यासाठी टास्क फोर्स सोबत बैठक करून नियोजन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यात 702 कोरोना रुग्णांची नोंद

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून मंगळवारी 702 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच दोन तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 521, पनवेल ग्रामीण 68, उरण 2, खालापूर 17, कर्जत 8, पेण 23, अलिबाग 28, माणगाव 10, रोहा 17, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 5 तर पोलादपूर 1 असे 702 रुग्ण आढळले. तसेच मुरुड आणि सुधागड या 2 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

इतर बातम्या:

IND vs SA: अजिंक्य-चेतेश्वरला ALL THE BEST, दोघांसाठी आज ‘करो या मरो’

आपल्या ग्राहकांसाठी एसबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय; आएमपीएस सेवेच्या नियमामध्ये केले बदल, ‘असे’ असतील नवे नियम

Navi Mumbai and Raigad corona cases increased administration alert to stop corona wave

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.