AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची भर पावसात सभा, मोदी-शाहांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले, ‘उद्धव ठाकरेला संपवून दाखवा’

उद्धव ठाकरे यांनी या सभेत बेधडकपणे भर पावसात भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचं भाषण काही काळ सुरु झाल्यानंतर पावसाचा वेग कमी झाला. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप, मोदी-शाह यांच्यावर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे यांची भर पावसात सभा, मोदी-शाहांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले, 'उद्धव ठाकरेला संपवून दाखवा'
उद्धव ठाकरे यांची भर पावसात सभा
| Updated on: Apr 23, 2024 | 8:37 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज परभणीत जाहीर सभा पार पडली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची परभणीत सभा पार पडली. या सभेवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सभा काही काळासाठी थांबते की काय? अशी भावना अनेकांच्या मनात आली. पण सभा थांबली नाही. उद्धव ठाकरे यांनी या सभेत बेधडकपणे भर पावसात भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचं भाषण काही काळ सुरु झाल्यानंतर पावसाचा वेग कमी झाला. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप, मोदी-शाह यांच्यावर सडकून टीका केली.

“परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी विकत घेता येतं. पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रुपाने माझ्या समोर बसलं आहे. ही आपली परीक्षा आहे. अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘तुम्हाला उठाबशा काढायला सांगितल्याशिवाय राहणार नाही’

“तुम्हाला कल्पना आहे, एक-दोन दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल चिन्ह आहे त्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी, जय शिवाजी, आता त्या गाण्यातला मोदी-शाहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्याने सांगितलं की, जय भवानी शब्द काढा. काढायचा शब्द? मी तर मोदी आणि शाह यांना सांगतो, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हा जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला सांगितल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘पाठीत वार केला तेव्हा…’

“तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचा आहे ना? बघा प्रयत्न करुन. हा उद्धव ठाकरे उभा आहे आणि त्याच्यासमोर हे सर्व मर्द मराठे उभे आहेत. तुमच्या मनात जय भवानी शब्दाबद्दल इतका द्वेष आणि आकस का आहे? यांना काय वाटतं? दिल्लीत बसले म्हणजे आपण म्हणू तसं सगळा देश ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, गुरं-ढोरं नाहीत. अंगावर आलात प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वार केला तेव्हा ही माझी वाघनखं बाहेर आलेली आहे. हे मुनगंटीवारांसाठी शोबाजी करत नाही. आम्ही वाघनखं परत आणणार. बसा. स्वत:ची नखे काढत बसा”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.