Raj Thackeray Uttar Sabha Thane: 12 ते 3 मे, राज ठाकरेंची सरकारला भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईन, सुप्रीम कोर्टाची टिप्पणीही भरसभेत वाचून दाखवली का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्याविरोधात आवाज उठवला आहे. काल तर राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंग्यावरून थेट डेडलाईनच दिली आहे. येत्या 3 तारखेला ईद आहे.

Raj Thackeray Uttar Sabha Thane: 12 ते 3 मे, राज ठाकरेंची सरकारला भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईन, सुप्रीम कोर्टाची टिप्पणीही भरसभेत वाचून दाखवली का?
12 ते 3 मे, राज ठाकरेंची सरकारला भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईन, सुप्रीम कोर्टाची टिप्पणीही भरसभेत वाचून दाखवली का?
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Apr 13, 2022 | 10:25 AM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्याविरोधात आवाज उठवला आहे. काल तर राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंग्यावरून थेट डेडलाईनच दिली आहे. येत्या 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला माझी विनंती आहे की, कुठचीही तेढ, दंगल आम्हाला करायची नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 3 मेपर्यंत महाराष्ट्राच्या (maharashtra) सगळ्या मशिदींच्या (masjid) मौलवींना बोलवा. त्यांची बैठक घ्या. त्यांना सांगा.. लाऊडस्पीकर उतरवा. 3 तारखेपर्यंत आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर 3 तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाही तर आम्ही हनुमान चालिसा सुरू करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी भोंग्यांबाबतची आपली भूमिका विस्ताराने मांडली. ही भूमिका मांडताना भोंग्यांबाबतचं मत आपलं आजचं नसून जुनंच आहे असं सांगत त्यांनी त्यांच्या भाषणाचे व्हिडीओही दाखवले.

आज तुमचा रमजान आहे. आम्ही समजू शकतो. आमचाही गणेशोत्सव असतो. नवरात्रोत्सव असतो. दहा दिवस लाऊडस्पीकर लागतो. तरीही लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, हा भाग वेगळा. सणवार असेल तर आम्ही समजू शकतो. 365 दिवस कशासाठी? कुणासाठी? या गोष्टी ऐकवता. एक तर सूर बेसूर असतो, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

कोर्ट काय म्हणाले? राज यांनी निर्णय वाचला

राज ठाकरे यांनी यावेळी भोंग्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणीच वाचून दाखवली. 18 जुलै 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. इतरांची शांतता बिघडवून तुम्ही प्रार्थना करा, असं कोणताही धर्म सांगत नाही. वृद्धांची, विद्यार्थ्यांची झोपमोड करणं, त्यांना त्रास देणं, अशा कोणत्याही गोष्टींना परवानगी देता कामा नये, असं कोर्टानेच सांगितलंय. मग हे होत का नाहीये? मतांसाठी.. हे मतांसाठी काहीही चालवणार.. आम्ही हे काय फक्त बघत बसायचं आणि हा देशभर त्रास आहे. तमाम हिंदूना माझं सांगणं आहे.. जिथे जिथे बांग आणि भोंगे लागत असतील तिथंतिथं हनुमान चालीसा लागलंच पाहिजे.. आम्हाला काय त्रास होतो, हा त्यांनाही होऊ दे… एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

भात्यातला बाण काढायला लावू नका

ज्या मुसलमानांना प्रार्थना करायची आहे, त्यांनी प्रार्थना करा घरात. एक गोष्ट सांगतो… आता हनुमान चालीसा सांगितलंय. अजून मी माझ्या भात्यातला बाण काढलेला नाहीये. तो काढायला लावू नका आणि म्हणून या संपूर्ण राज्य सरकारला केंद्राला विनंती आहे, जिथे समाजाला त्रास होतोय, अशा कोणत्याही गोष्टी असता कामा नये. आपण स्वतःहून मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: यांचे दाखवायचे ‘सुळे’ वेगळे, राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळे

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंनी कारणावर बोट ठेवलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें